Coronavirus | देशात कोरोनाचा फैलाव! कोरोना बाधितांची संख्या 2018वर, तर 41 जणांचा मृत्यू
कोरोनाने सध्या देशात हाहाकार माजवला आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. तर देशातील सर्वाधिक कोरोनाचे रूग्ण हे महाराष्ट्रात आहेत.
नवी दिल्ली : भारतामध्ये कोरोना बाधितांची संख्या 2018 वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत 41 लोकांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. तर 171 लोक ठीक झाले आहेत. आरोग्य मंत्रालयाने बुधवारी सांगितलं की, 24 तासांमध्ये 386 कोरोनाचे रूग्ण आढळून आले आहेत. तर तीन लोकांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीतील निजामुद्दीनमध्ये तब्लिकी समाजाच्या धार्मिक कार्यक्रमामुळे कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
कोरोनाबाबत सरकारकडून अनेक उपाययोजना
कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर कॅबिनेट सचिव राजीव गाबाने बुधवारी राज्यातील पोलीस आयुक्तांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. बैठकीमध्ये राज्यसरकारला दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या लोकांचा युद्धपातळीवर कॉन्टेक्ट ट्रेसिंग करण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर वीजा नियमांचं उल्लंघन करणाऱ्यां विरोधात करवाई करण्याचे आदेशही देण्यात आले होते. महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक 325 कोरोना बाधित आहेत. तर केरळमध्ये 265, तामिळनाडूमध्ये 234, दिल्लीमध्ये 123, उत्तरप्रदेशमध्ये 116, राजस्थानमध्ये 108, कर्नाटकात 105 प्रकरणं समोर आली आहेत. तसेच जगभरातील कोरोना बाधितांचा आकडा 8 लाखांच्या पार गेला आहे.
पाहा व्हिडीओ : राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची उत्तरे
तामिळनाडू : तब्लिकीच्या धार्मिक कार्यक्रमातून 110 संसर्गजन्य
दिल्लीमध्ये तब्लिकी जमातीच्या धार्मिक कार्यक्रमातून तामिळनाडूमध्ये परतलेल्या 110 लोकांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. ज्यामुळे राज्यातील संसर्गजन्य लोकांची संख्या 234 वर पोहोचली आहे. तामिळनाडूमध्ये 515 लोकांची ओळख पटली असून ते सर्वजण निजामुद्दीन येथे पार पडलेल्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाले होते. मीडियी रिपोर्ट्सनुसार, राज्यातील जवळपास 1500 लोक कार्यक्रमात सहभागी झाले होते. ज्यापैकी 1131 लोक राज्यात परतले आहेत.
एका आठवड्यात मृतांचा आकडा दुप्पट झाला; डब्ल्यूएचओ चिंतीत
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशन (डब्ल्यूएचओ) ने बुधवारी सांगितलं की, कोरोना व्हायरसची महामारी संपूर्ण जगभरात पसरली असून सध्या वाढत चाललेल्या प्रादुर्भावामुळे ते चिंतीत आहेत. डब्ल्यूएचओचे प्रमुख टेडरोस एडहानोम घेब्रेयासस यांनी सांगितलं की, 'मागील आठवड्यात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. पुढिल काही दिवसांत संसर्ग झालेल्यांची संख्या 10 लाख आणि मृत्यू झालेल्यांची संख्या 50,000 होऊ शकते.'
पाहा व्हिडीओ : 'मरकज'हून परतलेले 442 जण मुबंई आणि परिसरात आढळले
मध्यप्रदेशात 86 रूग्ण त्यातील आठ कोरोनामुक्त
मध्यप्रदेशात कोरोना व्हायरचा संसर्ग झालेल्यांची संख्या 86 असून त्यातील आठ रूग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. 14 दिवसांसाठी क्वॉरंटाईन केल्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात आलं आहे. मध्यप्रदेशमध्ये इंदोरमध्ये सर्वाधिक 63 रूग्ण आहेत. याव्यतिरिक्त जबलपुरमधील आठ, उज्जैनचे सहा, भोपाळचे चार, शिवपुरू म्हणजेच, ग्वालियरचे प्रत्येकी दोन तर खरगोनमध्ये एक रूग्ण आहे. यापैकी सहा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी इंदोरमधील तीन, उज्जैनमधील दोन आणि खरगोनमधील एका रूग्णाचा समावेश आहे.
सकाळी 11 वाजता सर्व राज्यांतील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार पंतप्रधान
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता सर्व राज्यांतील मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे चर्चा करणार आहेत. दुसऱ्यांदा पंतप्रधान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यांतील मुख्यमंत्र्यांशी थेट चर्चा करणार आहेत. याआधी देशामध्ये 21 दिवसांसाठी लॉकडाऊन लागू करण्यात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रत्येक राज्यांतील मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती. आतापर्यंत मोदींनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनतेला दोन वेळा संबोधित केलं आहे. त्यातील एकदा कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर एक दिवस जनता कर्फ्यूची घोषणा केली होती. तर दुसऱ्यांदा त्यांनी 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली होती.
संबंधित बातम्या :
निजामुद्दीनसारखे प्रकरण महाराष्ट्रात खपवून घेणार नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Coronavirus | कोरोना व्हायरस संदर्भात फेक न्यूजची सुप्रीम कोर्टाकडून दखल; NBA ला आदेश
तबलिगी जमातच्या लोकांनी माफी मागावी; काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांची मागणी