Coronavirus Cases : सहा दिवसानंतर देशातील रुग्णसंख्या घटली; गेल्या 24 तासात 30 हजार नव्या रुग्णांची भर, 442 जणांचा मृत्यू
Coronavirus Cases Today : देशातील कोरोनाची सक्रिय रुग्णसंख्या अद्यापही चार लाखांच्या वरती आहे. सक्रिय रुग्णसंख्येमध्ये भारताचा जगात आठवा क्रमांक आहे.
Coronavirus Cases Today : गेल्या सहा दिवसांपासून वाढणाऱ्या कोरोनाच्या रुग्णसंख्येत आज काहीशी घट झाल्याचं दिसून आलंय. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 30,549 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली असून 422 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. केरळमध्ये काल दिवसभरात 13,984 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, काल दिवसभरात देशभरातून 38,887 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. देशात गेल्या सहा दिवसांपासून सलग 40 हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद केली जात होती.
गेल्या महिन्याभराच्या काळात कोरोनाबाधितांची संख्या घटली असली तरी सहा दिवसांपासून या संख्येत पुन्हा काहीशी वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. केरळमध्येही गेल्या सहा दिवसांपासून 20 हजारांच्या वर कोरोनाची रुग्णसंख्या येत होती. आज त्यात घट झाली आहे.
देशात आतापर्यंत तीन कोटी 17 लाख 26 हजार 507 कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत तर आतापर्यंत तीन कोटी आठ लाख 96 हजार 354 जण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. देशात आतापर्यंत कोरोनामुळे चार लाख 25 हजार 195 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे तर देशातील सक्रिय रुग्णांची संख्या आता चार लाख चार हजार 958 इतकी झाली आहे.
देशात आतापर्यंत 47 कोटी 85 लाख 44 हजार 114 कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. काल एकाच दिवशी 61 लाख नऊ हजार 587 कोरोनाचे डोस देण्यात आले आहेत.
India reports 30,549 new #COVID19 cases, 38,887 discharges & 422 deaths in last 24 hours as per Union Health Ministry
— ANI (@ANI) August 3, 2021
Total cases: 3,17,26,507
Total discharges: 3,08,96,354
Death toll: 4,25,195
Active cases: 4,04,958
Total Vaccination: 47,85,44,114 (61,09,587 in last 24 hours) pic.twitter.com/lkS8eBMZh9
राज्याची स्थिती
राज्यात काल 4,869 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 8 हजार 429 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 61 लाख 03 हजार 325 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.65 टक्के झाले आहे.
राज्यात काल कोरोनामुळे 90 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.1 टक्के झाला आहे. तब्बल 38 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 75 हजार 303 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. एकूण सहा जिल्ह्यांमध्ये अॅक्टिव्ह रुग्ण 100 च्या खाली आहेत. नंदूरबार (9), हिंगोली (64), अमरावती (82) वाशिम (89), गोंदिया (97), गडचिरोली (16) या सहा जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 15, 476 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
नंदूरबार, हिंगोली, वर्धा, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये आज शून्य रुग्ण आढळले आहेत. तर अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक 762 रुग्णांची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,83,52,467 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 63,15,063 (13.6 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 4,61,637 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 3,103 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- CBSE 10th Result 2021 : आज दुपारी 12 वाजता जाहीर होणार CBSE बोर्डाचा दहावीचा निकाल, कुठे पाहाल?
- Petrol Diesel Price : सतराव्या दिवशीही नाही वाढल्या पेट्रोल-डिझेलच्या किमती, तुमच्या शहरांतील दर काय?
- Venezuelan Gold : 1.6 अब्ज युरो किंमतीच्या 'व्हेनेझुएलन गोल्ड' केसची सुनावणी पूर्ण; भारतासहित इतर देशांवर होणार परिणाम