Coronavirus In India: देशात गेल्या 24 तासात 2,82,970 नव्या रुग्णांची नोंद, 441 जणांचा मृत्यू
Coronavirus In India: देशात सध्या 18 लाख 31 हजार रुग्ण सक्रीय असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं बुधवारी दिलीय.
Coronavirus In India: देशात गेल्या 24 तासात 2 लाख 82 हजार 970 नवे रुग्ण आढळले असून 441 मृत्युची नोंद करण्यात आलीय. तर, एकाच दिवशी 1 लाख 88 हजार 157 रुग्णांनी कोरोनावर मात केलीय. ज्यामुळं देशातील कोरोनाबाधितांच्या एकूण संख्या 3 कोटी 79 लाख एक हजार 241 वर पोहचली आहे. यात 8 हजार 961 ओमायक्रॉनबाधित रुग्ण आहेत. देशात सध्या 18 लाख 31 हजार रुग्ण सक्रीय असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं बुधवारी दिलीय.
देशात मंगळवारी 24 तासात देशात 2 लाख 38 हजार 18 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 310 जणांचा मृत्यू झाला होता. तर, मंगळवारी दिवसभरात 1 लाख 57 हजार 421 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सोमवारच्या तुलनेत आज कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. सोमवारी देशात 2 लाख 58 हजार 89 रुग्णांची नोंद झाली होती.
डॉ समीरन पांडा हे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या महामारीविज्ञान विभागाचे प्रमुख आहेत. त्यांनी नुकत्याच एका मुलाखतीमध्ये दिलेल्या माहितीनुसार, कोविड-19 महामारीच्या देशातील तिसऱ्या लाटेत दिल्ली आणि मुंबईने शिखर गाठले आहे की नाही याची पुष्टी आत्ताच करणं हे खूप घाईचं ठरेल. दरम्यान, दिल्ली आणि मुंबई या दोन मोठ्या महानगरांमध्ये कोविड-19 च्या ओमिक्रॉन आणि डेल्टा प्रकरणाचे प्रमाण अनुक्रमे 80 आणि 20 टक्के आहे. भारतातील विविध राज्ये सध्या महामारीच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर असल्याचेही डॉ समीरन पांडा यांनी स्पष्ट केलंय.
दरम्यान लसीकरण झालं असल्यास डेल्टा व्हेरियंटची लागण होण्याची शक्यता फार कमी आहे. तसंच लसवंत व्यक्तींना ओमायक्रॉन या व्हेरियंटची लागणही कमी प्रमाणात होत असून झाल्यास देखील अधिक प्रकृतीवर परिणाम होत नाही. तसंच लवकर बरं होण्यातही मदत होते, असंही अभ्यासातून समोर आल्याने एकदंरीत लस घेणं अनेकरित्या फायद्याचं असून WHO ने देखील हेच आवाहन केले आहे.
हे देखील वाचा-
- Magh month : माघ महिन्याचे नेमके महत्त्व काय? का केलं जातं गंगेत स्नान...
- उपासमारीवर कम्युनिटी किचन योजनेच्या मॉडेलचा विचार करा; सुप्रीम कोर्टाचा केंद्राला सल्ला
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha