(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coronavirus In India: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोदींची आढावा बैठक सुरू, अमित शाह आणि आरोग्यमंत्र्यांसह अनेक अधिकारी उपस्थित
Coronavirus In India: देशात सध्या 5 लाख 90 हजार 611 रुग्ण सक्रीय आहेत.
Coronavirus In India: देशातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होऊ लागलीय. याच पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी रविवारी उच्चस्तरीय आढावा बैठक बोलावली आहे. ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होत आहे. या आढावा बैठकीत पीएमओच्या अधिकाऱ्यांव्यतिरिक्त गृहमंत्री अमित शहा (Amit Shah), केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया, कॅबिनेट सचिव राजीव गौबा, गृह सचिव अजय भल्ला, आरोग्य सचिव राजेश भूषण, आयसीएमआरचे डीजी आणि इतर अनेक अधिकारी उपस्थित होते.
कोरोनाचा कहर सुरूच
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात कोरोना महामारीमुळं आतापर्यंत एकूण 4 लाख 83 हजार कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालाय. देशात काल (शनिवारी) 40 हजार 863 जणांनी कोरोनावर मात केलीय. ज्यामुळं देशातील कोरोना मुक्तांची संख्या 3 कोटी 44 लाख 53 हजार 603 वर पोहचलीय. देशात सध्या 5 लाख 90 हजार 611 रुग्ण सक्रीय आहेत.
देशातील ओमायक्रॉनची परिस्थिती
कोरोनाच्या ओमिक्रॉन प्रकारामुळं मोठ्या प्रमाणात लोकांना संसर्ग होत आहे. देशात आतापर्यंत 3 हजार 623 ओमायक्रॉनची रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 1 हजार 409 रुग्णांनी ओमायक्रॉनवर मात केलीय. याशिवाय, ओमायक्रॉनमुळं देशात दोन जणांचा मृत्यू झालाय.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha