Coronavirus in India: गर्दीच्या ठिकाणी मास्क आणि सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळण्याच्या सूचना राज्य सरकारांना दिल्याची केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची लोकसभेत माहिती
Mansukh Mandaviya: 'गर्दीच्या ठिकाणी मास्क आणि सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळण्याच्या सूचना राज्य सरकारांना दिल्या आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय (Mansukh Mandaviya) यांनी लोकसभेत बोलताना दिली आहे.
Coronavirus in India: ''सण आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर गर्दीच्या ठिकाणी लोकांनी मास्क घालावेत, सोशल डिस्टन्सिंग नियम पाळण्याच्या सूचना राज्य सरकारांना दिल्या आहेत,'' अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय (Mansukh Mandaviya) यांनी लोकसभेत (Lok Sabha and Rajya Sabha) बोलताना दिली आहे.
India Coronavirus Update: भारतात अद्यापही कोरोना सीमित
लोकसभेत (Lok Sabha and Rajya Sabha) बोलताना आरोग्यमंत्री मांडवीय (Mansukh Mandaviya) म्हणाले आहेत की, जगभरात कोरोनाचा प्रभाव दिसत आहे. कोरोनाने (Coronavirus) प्रत्येक देशाला प्रभावित केले आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक देशांमध्ये कोरोनाचे (Coronavirus) रुग्ण वाढत आहेत. मात्र भारतात मात्र सातत्याने कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट होत आहे. भारतात दररोज सरासरी 153 नवीन प्रकरणे नोंदवली जात आहेत. तर संपूर्ण जगात दररोज 5 लाखांहून अधिक प्रकरणे नोंदवली जात आहेत. जपान, चीन, दक्षिण कोरिया, अमेरिका, फ्रान्स आणि इटली यांसारख्या देशांमध्ये कोरोनाचे (Coronavirus) मृत्यू आणि नवीन रुग्ण आढळून येत आहेत.
India Coronavirus Update: केंद्र सरकारने राज्य सरकारांना दिले निर्देश
कोरोनाबाबत अधिक माहिती देताना मनसुख मांडविया म्हणाले की, ''भारतात 220 कोटी लसी देण्यात आल्या आहेत, हा एक विक्रम आहे. आरोग्य मंत्रालय जागतिक परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे. यासाठी राज्यांनाही सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यांना जिनोम सिक्वेन्सिंगसाठी सल्ला देण्यात आला आहे. जेणेकरून देशात कोणताही नवीन प्रकार आला तर त्याची वेळीच ओळख करून घेऊन पावले उचलता येतील. येत्या सण आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्यांनी सतर्क राहून मास्क घालणे, सॅनिटायझर वापरणे, स्वच्छतेची काळजी घेणे आणि सोशल डिस्टन्सिंग राखणे यासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत.''
India Coronavirus Update: कोरोना अजून संपलेला नाही : आरोग्य मंत्री
परदेशातून येणाऱ्या प्रवाशांचे नमुने घेण्यासही विमानतळांवर सुरुवात करण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी (Mansukh Mandaviya) दिली. ते (Mansukh Mandaviya) पुढे म्हणाले की, या महामारीसाठी आम्ही दृढनिश्चयी आहोत आणि त्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जात आहेत. कोरोना (Coronavirus) महामारी अजून संपलेली नाही, हे सर्व लोकांना समजावून सांगण्याची गरज आहे. आपण कोरोना लसीचा बूस्टर डोस लावला पाहिजे आणि सतर्क राहिले पाहिजे. कोरोनाविरुद्धचा (Coronavirus) लढा एकत्रितपणे सुरू ठेवण्याची गरज आहे.