(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coronavirus in India : देशात दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत 50 टक्क्यांची घट, 3 आठवड्यांत कोरोनाला काहीसा ब्रेक
Coronavirus in India : देशातील कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसर्या लाटेच्या सरासरी दैनंदिन रुग्णसंख्येत अर्ध्या वेळेतच 50 टक्के घट झाली आहे. दरम्यान, दैनंदिन रुग्णांच्या मृत्यूसंख्येत कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येप्रमाणे कोणतीही घट झालेली नाही.
Coronavirus in India : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव पाहायला मिळत होता. परंतु, गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोनाबाधितांच्या दैनंदिन संख्येत घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. केवळ तीन आठवड्यांत 8 मे रोजी दैनंदिन रुग्णसंख्येच्या सात दिवसांची सरासरी वाढलेल्या संक्रमणाच्या विक्रमी संख्येपेक्षा अर्ध्यावर गेली आहे. देशातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीनुसार, शनिवारी दैनंदिन रुग्णसंख्येच्या आकडेवारीची सरासरी 2 लाखांपेक्षा कमी झाली आणि दैनंदिन रुग्णसंख्येचा आकडा 1,95,183 इतका होता. जो दुसऱ्या लाटेतील सर्वाधिक 3,91,263 रुग्णसंख्येच्या जवळपास 50 टक्के एवढा होता. देशातील कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसर्या लाटेच्या सरासरी दैनंदिन रुग्णसंख्येत अर्ध्या वेळेतच 50 टक्के घट झाली आहे.
देशात कोरोनाच्या पहिल्या लाटेत 17 सप्टेंबर रोजी सरासरी 93,735 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर सहा आठवड्यांनी 30 ऑक्टोबरपर्यंत या संख्येत घट होऊन अर्ध्यावर आली होती. दरम्यान, दैनंदिन रुग्णांच्या मृत्यूसंख्येत कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येप्रमाणे कोणतीही घट झालेली नाही. दैनंदिन सरासरी मृतांच्या संख्येत 18 टक्क्यांनी घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. यामध्ये महाराष्ट्राचा 5 हजारांहून अधिक मृतांच्या आकड्याचा समावेश नाही.
दैनंदिन मृतांची संख्या 3 हजारांवरच
16 मे रोजी सात दिवसांच्या सरासरीने दैनंदिन मृतांचा आकडा 4040 पर्यंत पोहोचला होता, सध्या ही संख्या 3324 इतकी आहे. देशात कोरोना महामारीमुळे होणार्या दैनंदिन मृतांची संख्या आतापर्यंत 3 हजारांहून खाली आलेली नाही. शनिवारी देशात या व्हायरसमुळे 3080 मृत्यू झाले आहेत. जे गेल्या काही दिवसांतील आकड्याच्या तुलनेत जवळपास सारखीच होती.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे, रुग्णांच्या संख्येत घट होण्यास सुरुवात झाल्यानंतर कोरोनाबाधितांची संख्या पूर्वीची वाढ दर्शवते. तीन आठवड्यांत कोरोनाबाधितांच्या दैनंदिन सरासरी आकडेवारीत अर्ध्याहून अधिक घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर ही संख्या तीन वर्षांपूर्वी ही संख्या अर्ध्यापेक्षा कमी होती. देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव सुरु होण्यापूर्वी 17 एप्रिल रोजी सात दिवसांची सरासरी आकडेवारी 2,03,949 इतकी होती.
महाराष्ट्रात शनिवारी सहा जिल्ह्यांमध्ये हजारच्या घरात नवीन कोरोना रुग्णांची नोंद
राज्यात रोज कमी होणाऱ्या रुग्णसंख्या पाहता कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. राज्यात काल 20,295 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 31 हजार 964 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आता रिकव्हरी रेट 93.46 टक्क्यांवर पोहचला आहे. दरम्यान आज 443 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरी भागात कोरोना बऱ्यापैकी आटोक्यात येताना दिसत आहे. मात्र, ग्रामीण भागात अजूनही कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात आढळत असल्याचे आकडेवारीवरुन दिसत आहेत.
राज्यात सध्या सहा जिल्ह्यांमध्ये नवीन कोरोना रुग्णसंख्या हजारच्या पुढे नोंद होत आहे. यात मुंबई 1038, अहमदनगर 1246, पुणे 1259, सातारा 2177, कोल्हापूर 1611 आणि सांगली 1063 असा समावेश आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :