एक्स्प्लोर
Coronavirus | देशातील लॉकडाऊन वाढणार; 14 मेपर्यंत टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन हटवणार : सूत्र
देशात 14 मेपर्यंत लॉकडाऊन वाढण्याची शक्यता असून ज्या भागात कोरोनाचा प्रभाव कमी आहे अशा ठिकाणी टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन शिथिल करणार असल्याची सूत्रांची माहिती

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचं संक्रमण रोखण्यासाठी देशात 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. आज या लॉकडाऊनचा शेवटचा दिवस आहे. आज सकाळी 10 वाजता नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार आहेत. सूत्रांच्या दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसचा वाढता प्रसार पाहता सरकार लॉकडाऊन थांबवण्याच्या मनस्थितीत नाही आहे. पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात सांगितलं होतं, की दक्षिण कोरिया आणि चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना पसरताना पाहायला मिळतो आहे. त्यामुळे आपल्या योग्य ती खबरदारी घेणं गरजेचं आहे. अशातच पंतप्रधान मोदी देशातील लॉकडाऊन वाढवणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. देशातील लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढवणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देशात 14 मेपर्यंत लॉकडाऊन वाढण्याची शक्यता असून सरकार ज्या भागात कोरोनाचा प्रभाव कमी आहे अशा ठिकाणी टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन शिथिल करणार आहे. तसेच असं देखील बोललं जात आहे की जगभरातीत देशांच्या तुलनेत भारतात याचा प्रभाव कमी आहे. कारण भारत सरकारने वेळीच यावर योग्य ती खबरदारी घेतली होती. दरम्यान 14 मेपर्यंत टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन शिथिल करण्यासाठी सरकार प्रत्येक आठवड्याला आढावा घेण्याची शक्यता आहे.
- ज्या भागात कोरोनाबाधितांचा आकडा जास्त आहे त्यांना कोणतीही सूट मिळणार नाही.
- दिल्ली आणि एनसीआरमध्ये देखील सूट मिळण्याची शक्यता नाही.
- मोठ्या प्रमाणात लोकांनी एकत्र जमू नये यासाठी रेल्वे देखील बंद ठेवण्यात येऊ शकते.
- परिस्थीतीचा आढावा घेत रेल्वेसेवा सुरु करण्यात येईल.
- टप्प्याटप्प्याने प्रवासी गाड्यांची संख्या वाढवण्यात येईल.
- चित्रपटगृह, मॉल, कॉलेज आणि शाळा सुरु होणार नाही
आणखी वाचा























