एक्स्प्लोर

Lockdown 2 | काय करता येईल, काय नाही, दुसऱ्या टप्प्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाची मार्गदर्शक तत्वं जारी

Lockdown 2 कोरोनासाठी घोषित केलेल्या दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनसाठी केंद्रीय गृहमंत्रालयाची मार्गदर्शक तत्वं जारी करण्यात आली आहेत. मास्क लावणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर दंड आकारण्यात यावा, दारु, गुटखा, तंबाखूची विक्री बंद ठेवण्यात यावी यासह अनेक महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.

नवी दिल्ली: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशातील लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवण्याची घोषणा मंगळावारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणात लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात सरकारकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचं कठोर पालन करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून यासंबंधित तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे आज जाहीर करण्यात आली आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. यात सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी चेहरा झाकणे म्हणजे मास्क घालणे बंधनकारक केलं आहे. आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शकतत्वांनुसार सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे.  कुठल्याही संस्थेने किंवा सार्वजनिक ठिकाणच्या व्यवस्थापकाने पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र जमण्याची परवानगी देऊ नये. लग्न आणि अंत्यसंस्कार अशावेळी जास्त लोक एकत्र येणार नाहीत, यासाठी जिल्हा दंडाधिकाऱ्याने नियमन करावे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर दंड आकारण्यात यावा. दारु, गुटखा, तंबाखूची विक्री बंद ठेवण्यात यावी यासह अनेक महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. 20 एप्रिलनंतर या गोष्टींची अंमलबजावणी  (कोरोना हॉटस्पॉट असलेली क्षेत्रं वगळता) आयटी कंपन्या 50 टक्के कर्मचाऱ्यांसह काम करु शकतील शेतीशी संबंधित सर्व व्यवहारांना सूट ग्रामीण भागातल्या काही उद्योगांनाही सूट मनरेगाची कामं चालूच राहणार ई-कॉमर्स कंपन्यांनाही काम करण्याची परवानगी कुरिअर सेवांना काम करण्याची परवानगी लॉकडाऊन अडकलेल्या लोकांसाठी हॉटेल आणि लॉज सुरु करणार मोटर मेकॅनिक, कार पेंटर, इलेक्ट्रिशियन आणि प्लंबर लोकांना काम करण्याची परवानगी SEZ मधील उद्योगांना काम करण्याची परवानगी. गावांमध्ये रस्ते आणि इमारत बांधकामांना परवानगी कामाच्या ठिकाणी शिफ्टमध्ये एक तासाचा ब्रेक असावा ज्यांची मुलं पाच वर्षांपेक्षा कमी वयाची आहेत अशा कामगारांना शक्यतो वर्क फ्रॉम होम द्यावं दुसऱ्या टप्प्यात आजपासून (15 एप्रिलपासून) या गोष्टींवर निर्बंध पूर्ण देशात रेल्वे, रस्ते आणि विमान वाहतुकीवर बंदी शाळा, महाविद्यालय, कंपन्या, रेस्टॉरंट, हॉटेल्स बंद सिनेमा हॉल, मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स, जिम बंद कार्यालयं आणि सार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकणं बंधनकारक राजकीय सभा, धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन तीन मेपर्यंक बंद देशात तीन मे पर्यंत बंद सर्व धार्मिक स्थळं बंद रस्त्यावर थुंकल्यावर दंड, लॉकडाऊनचं उल्लंघन केल्यावर कारवाई हॉटस्पॉट क्षेत्रात केवळ आवश्यक सामग्रीचीच उपलब्धता दारू, गुटखा, तंबाखू विक्रीवर कडक बंदी असावी महत्वाचं- सरकारच्या या मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी ही ज्या क्षेत्रांमध्ये नियम शिथिल केले आहेत त्याच क्षेत्रांमध्ये केली जाईल. 20 एप्रिलपर्यंत अशा क्षेत्रांना निवडलं जाईल. ज्या ठिकाणी कोरोना हॉटस्पॉट नाही किंवा कोरोना हॉटस्पॉट बनण्याची शक्यता नाही अशा विभागात ही सवलत दिली जाणार आहे. Lockdown 2 | काय करता येईल, काय नाही, दुसऱ्या टप्प्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाची मार्गदर्शक तत्वं जारी Lockdown 2 | काय करता येईल, काय नाही, दुसऱ्या टप्प्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाची मार्गदर्शक तत्वं जारी 20 एप्रिलनंतर लॉकडाऊन शिथील होणार? पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात सांगितल्याप्रमाणं 3 मेपर्यंत आपल्या सर्वांना, देशातील प्रत्येक नागरिकाला लॉकडाऊनमध्येच राहावं लागेल. पुढच्या एका आठवड्यात कोरोना विरोधातील लढाईमध्ये नियम आणखी कठोर करण्यात येतील. 20 एप्रिलपर्यंत प्रत्येक जिल्हा, ठिकाण आणि राज्यावर बारिक नजर ठेवली जाईल. तिथे लॉकडाऊनचं किती पालन होत आहे, त्या क्षेत्राने कोरोनापासून स्वतःला कितपत वाचवलं आहे, हे पाहिलं जाईल. तसेच ते म्हणाले की, जी क्षेत्र या अग्निपरीक्षेत सफल होतील, जे हॉटस्पॉटमध्ये नसतील आणि ज्यांची हॉटस्पॉटमध्ये रूपांतरित होण्याची शक्यता कमी असेल तिथे 20 एप्रिलपासून वर दिलेल्या आवश्यक सेवा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Chandrapur : मुनगंटीवारांच्या नाराजीनाट्यामुळं काय बदललं? चंद्रपुरात भाजपचा सर्वांना खुश करणारा तोडगा
मुनगंटीवारांच्या नाराजीनाट्यामुळं काय बदललं? चंद्रपुरात भाजपचा सर्वांना खुश करणारा तोडगा
Vasai Virar Election : वसई-विरारचा तिढा सुटला, 91 जागांवर भाजप तर 24 जागांवर शिंदेंची शिवसेना लढणार
वसई-विरारचा तिढा सुटला, 91 जागांवर भाजप तर 24 जागांवर शिंदेंची शिवसेना लढणार
भाजपचा तो पराभव माझ्यामुळे झाला तर आनंदाची बाब; एकनाथ खडसेंचा गिरीश महाजनांवर पलटवार
भाजपचा तो पराभव माझ्यामुळे झाला तर आनंदाची बाब; एकनाथ खडसेंचा गिरीश महाजनांवर पलटवार
Gold Rate : सोने चांदीच्या दरवाढीचा ट्रेंड कायम, 2026 मध्ये दर किती रुपयांपर्यंत वाढणार? तज्ज्ञ काय म्हणाले? अधिक परतावा कुठं मिळणार? 
सोने चांदीच्या दरवाढीचा ट्रेंड कायम, 2026 मध्ये दर किती रुपयांपर्यंत वाढणार? तज्ज्ञ काय म्हणाले?

व्हिडीओ

Sayaji Shinde Vanrai : सयाजींच्या वनराईवर कुणाची वाकडी नजर? Special Report
Municipal Corporation Election 2026 : महानगरपालिका निवडणुकीतही घराणेशाहीचा दबदबा Special Report
Prashant Jagtap NCP : प्रशांत जगताप काँग्रेसचा हात धरणार? अजितदादांमुळे काकाशी कट्टी... Special Report
Kishor Jorgewar Vs Mungantiwar : जोरगेवार भी खुश, मुनगंटीवार भी खुश? Special Report
Prakash Ambedkar  प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेवरून संभ्रम कायम Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrapur : मुनगंटीवारांच्या नाराजीनाट्यामुळं काय बदललं? चंद्रपुरात भाजपचा सर्वांना खुश करणारा तोडगा
मुनगंटीवारांच्या नाराजीनाट्यामुळं काय बदललं? चंद्रपुरात भाजपचा सर्वांना खुश करणारा तोडगा
Vasai Virar Election : वसई-विरारचा तिढा सुटला, 91 जागांवर भाजप तर 24 जागांवर शिंदेंची शिवसेना लढणार
वसई-विरारचा तिढा सुटला, 91 जागांवर भाजप तर 24 जागांवर शिंदेंची शिवसेना लढणार
भाजपचा तो पराभव माझ्यामुळे झाला तर आनंदाची बाब; एकनाथ खडसेंचा गिरीश महाजनांवर पलटवार
भाजपचा तो पराभव माझ्यामुळे झाला तर आनंदाची बाब; एकनाथ खडसेंचा गिरीश महाजनांवर पलटवार
Gold Rate : सोने चांदीच्या दरवाढीचा ट्रेंड कायम, 2026 मध्ये दर किती रुपयांपर्यंत वाढणार? तज्ज्ञ काय म्हणाले? अधिक परतावा कुठं मिळणार? 
सोने चांदीच्या दरवाढीचा ट्रेंड कायम, 2026 मध्ये दर किती रुपयांपर्यंत वाढणार? तज्ज्ञ काय म्हणाले?
Army Social Media Policy : सैन्य दलातील जवानांना इन्स्टाग्रामवर खातं उघडता येणार पण... 'या' गोष्टींना मनाई, भारतीय सेना दलाकडून नवे नियम
सैन्य दलातील जवानांना इन्स्टाग्रामवर खातं उघडता येणार पण... 'या' गोष्टींना मनाई, भारतीय सेना दलाकडून नवे नियम
पुण्यात एकहाती सत्ता राखण्यासाठी भाजपची खेळी; उमेदवारी वाटपाचा फॉर्म्युला ठरला, जुन्यांना पुन्हा संधी
पुण्यात एकहाती सत्ता राखण्यासाठी भाजपची खेळी; उमेदवारी वाटपाचा फॉर्म्युला ठरला, जुन्यांना पुन्हा संधी
Kolhapur : हुपरीत 25 लाखांची बनावट दारू जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई
हुपरीत 25 लाखांची बनावट दारू जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई
उन्नाव बलात्कारातील दोषीची जन्मठेप स्थगित, पीडित कुटुंबीयांनाच पोलिसांकडून मारहाण; आदित्य ठाकरेंचा संताप
उन्नाव बलात्कारातील दोषीची जन्मठेप स्थगित, पीडित कुटुंबीयांनाच पोलिसांकडून मारहाण; आदित्य ठाकरेंचा संताप
Embed widget