Coronavirus : सावधान! देशात 343 नवे कोरोना रुग्ण, जगभरात वाढतोय कोरोनाचा संसर्ग
Coronavirus in India : देशातील कोरोना संसर्गात सातत्याने चढउतार पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत देशात 343 नवीन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
Coronavirus Cases Today in India : देशातील कोरोनाचा धोका अद्यापही कायम आहे. भारतातील कोरोना प्रादुर्भावामध्ये सातत्याने चढउतार पाहायला मिळत आहे. आज देशातील कोरोनाबाधितांची संख्या घटली आहे. गेल्या 24 तासांत 343 नवीन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत, तर चार रुग्णांना आपला जीव गमावला आहे. दरम्यान देशातील कोरोना संसर्ग किंचित घटला असला, तरी धोका कायम आहे. जगभरात चीन, जपान आणि ब्राझीलसह अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा कहर वाढताना दिसत आहे. चीनमधील अनेक शहरांमध्ये लॉकडाऊनही लागू करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य प्रशासनाकडून कोरोना विषाणूकडे दुर्लक्ष न करता काळजी घेण्याचं आणि सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन केलं जात आहे.
देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 5 हजारांवर
मागील 24 तासांत म्हणजेच शनिवारी दिवसभरात देशात हजारांहून कमी कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. आतापर्यंत देशातील एकूण कोरोना बळींची संख्या 5 लाख 30 हजार 612 वर पोहोचली. देशातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या पाच हजारांवर आहे. सध्या देशात 5,263 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत, काल ही संख्या 5,395 इतकी होती. देशात 219 कोटीहून अधिक कोरोना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोरोना संसर्गाचा वेग कमी करण्यात मदत झाली आहे
Single-day rise of 343 fresh cases pushes India's COVID-19 tally to 4,46,71,562, death toll climbs to 5,30,612: Union health ministry
— Press Trust of India (@PTI_News) November 27, 2022
काल कोरोना रुग्णांमध्ये 42 रुग्णांची वाढ झाली होती तुलनेनं आज कोरोनाबाधितांमध्ये 46 रुग्णांची घट झाली आहे. आज देशात 343 रुग्णांची नोंद झाली. शनिवारी देशात 389 रुग्ण आढळले होते. त्यामुळे देशातील कोरोना संसर्गामध्या सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. आतापर्यंत भारतात एकूण 4 कोटी 46 लाख 71 हजार 562 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे, यापैकी चार कोटीहून अधिक रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. तर 5 लाख 30 हजार 612 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
India's active COVID-19 cases have come down to 5,263 from 5,395: Union health ministry
— Press Trust of India (@PTI_News) November 27, 2022