Coronavirus : कोरोनाचा आलेख घटला, मात्र धोका कायम; सक्रिय रुग्णांची संख्या 17 हजारांवर
Coronavirus Cases Today : दिलासादायक बाब म्हणजे देशातील कोरोना संसर्गाचा आलेख किंचित घटला आहे. देशात कालच्या तुलनेत आज नोंद झालेल्या रुग्णांची संख्या 278 ने घटली आहे.
Coronavirus Cases Today in India : एकीकडे गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. कोरोना विषाणूसह बदलत्या मोसमात व्हायरल फ्लूचा धोका आहे. त्यातच कोरोनाच्या नवीन XBB व्हेरियंटमुळे कोरोनाच्या पाचव्या लाटेचा धोका व्यक्त केला जात आहे. जगासह देशातही कोरोनाच्या XBB व्हेरियंटच्या प्रकरणांची वाढ होत आहे. अशातच समोर आलेली एक दिलासादायक बाब म्हणजे देशातील कोरोना संसर्गाचा आलेख किंचित घटला आहे. देशात कालच्या तुलनेत आज नोंद झालेल्या रुग्णांची संख्या 278 ने घटली आहे. तर मृतांच्या संख्येतही घट झाली आहे. देशात आज 1326 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. काल 1604 रुग्ण आढळले होते. तर गेल्या 24 तासांत आठ रुग्णांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. काल कोरोनाबळींची संख्या आजच्या एवढीच म्हणजे आठ इतकी होती.
चार कोटीहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज नव्याने कोरोनाची आकडेवारी जारी केली आहे. त्यानुसार देशात गेल्या 24 तासांत एक हजार 326 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. यासोबतच कोरोनाबाधितांचा एकूण आकडा चार कोटी 46 लाख 53 हजार 592 इतका झाला आहे. भारतात गेल्या 24 तासांत एक हजार 723 रुग्णांनी कोविड19 विषाणू संसर्गावर मात केली आहे. आजपर्यंत 4 कोटी 41 लाख 6 हजार 656 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामध्ये कोरोला लसीकरणाचा मोठा वाटा आहे. देशव्यापी कोरोना लसीकरणामुळे कोरोना संसर्गाचा वेग करण्यात मोठी मदत झाली आहे. देशात कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे 219 कोटीहून अधिक डोस देण्यात आले आहेत.
Single day rise of 1,326 new coronavirus infections push India's COVID-19 tally to 4,46,53,592, death toll climbs to 5,29,024: Govt
— Press Trust of India (@PTI_News) October 31, 2022
कोरोनासोबत 'या' संसर्गाचा लहान मुलांना अधिक धोका
देशात एकीकडे कोरोनाचा संसर्ग वाढत असताना आता श्वसननलिकेच्या संसर्गाचा ( RSV Infection ) धोका आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. RSV संसर्गाचा धोका व्यक्त केला जात आहे. RSV संसर्ग श्वसननलिकेचा संसर्ग आहे. यामध्ये श्वसननलिकेला सूज येऊन श्वासोच्छवास करण्यास त्रास होतो. याचा संसर्ग लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना होऊ शकतो. हा संसर्ग लहान मुलांना अधिक शिकार बनवत आहे. कोरोना विषाणूची लागण आणि त्यासोबतच हा संसर्ग झाल्याचं धोका अधिक वाढतो. त्यामुळे योग्य ती काळजी घ्या. ताप, सर्दी, खोकला, धाप लागणे ही याची काही लक्षणे आहेत.
#Unite2FightCorona
— Ministry of Health (@MoHFW_INDIA) October 31, 2022
➡️ 1,326 New Cases reported in last 24 hours. pic.twitter.com/V9xnQaszDD
17 हजारांहून अधिक सक्रिय रुग्ण
सध्या देशात 17 हजार 912 कोरोना रुग्ण उपचाराधीन आहेत. गेल्या 24 तासांत 83 हजार 167 कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत. कोरोना महामारी सुरु झाल्यास आतापर्यंत प्रशासनाकडून 90.09 कोटीहून अधिक कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. भारताचा दैनंदिन कोरोना सकारात्मकता दर 1.59 टक्के आणि साप्ताहिक सकारात्मकता दर 1.08 टक्के आहे.