एक्स्प्लोर

RSV Infection : कोरोना आणि 'या' विषाणूचा एकत्रित संसर्ग घातक, लहान मुलांना अधिक धोका

Covid19 Alert : एकीकडे बदलत्या वातावरणात कोरोनाच्या पाचव्या लाटेचा धोका व्यक्त केला जात असताना कोरोना आणि श्वसननलिकेच्या संसर्गाचा धोका वाढला आहे.

Covid19 and RSV Infection Combination : सध्या जगभरात कोरोनाच्या ( Coronavirus ) ओमायक्रॉन ( Omicron ) प्रकाराच्या एक्सबीबी ( XBB ) या सब व्हेरियंटचा संसर्ग वाढताना दिसत आहे. हा नवा कोरोना सबव्हेरियंट ओमायक्रॉनपेक्षा अधिक संसर्गजन्य असल्याचं शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे. अशातच आता आरोग्य व्यवस्थेसमोर नवं आव्हान उभं राहिलं आहे. थंडीच्या मोसमाला सुरुवात झाली आहे. अशातच आता आरएसव्ही इंफेक्शन (RSV Infection) म्हणजे श्वसननलिकेचा संसर्ग वाढण्याचा धोका आरोग्य तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. कोरोना विषाणू, फ्लू आणि आरएसव्ही संसर्ग एकत्र यांचा एकत्रित संसर्ग धोकादायक ठरु शकतो, असा इशारा आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे.

कोरोना, फ्लू आणि आरएसव्हीचा एकत्रित संसर्ग

अमेरिकेत कोविड19, फ्लू आणि आरएसव्ही यांच्या संमिश्र संसर्गामुळे चिंतेचं वातावरण आहे. विषाणूंचा एकत्रित संसर्ग मुख्यत्वे लहान मुलांना आपला शिकार बनवत आहे. या तिन्ही विषाणूंचा संमिश्र संसर्ग झाल्यामुळे टेक्सासमध्ये अनेक लहान मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अनेक रुग्ण भरती झाल्याने आता रुग्णालयांमध्ये बेडही शिल्लक नाहीत. यानंतर आता युरोपमध्येही या संसर्गाचा फैलाव होताना दिसत आहे. 

देशात चेन्नईमध्ये RSV चा फैलाव

देशात चेन्नईमध्येही या संसर्गाची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. दरम्यान अमेरिकेच्या आरोग्य तज्ज्ञांनी RSV विषाणूच्या मुख्य लक्षणांबद्दल सांगितलं आहे. RSV आणि Covid19 विषाणूच्या संमिश्र संसर्गाची लक्षणे धोकादायक आहेत. अमेरिकेमध्ये गेल्या दोन वर्षांपासून आरएसव्ही संसर्गाची प्रकरणं आढळून येत आहेत. यामध्ये कोरोना आणि ओमायक्रॉन व्हेरियंटच्या संसर्गाने चिंतेत भर घातली आहे. त्यामुळे आरएसव्ही आणि कोरोना या संमिश्र संसर्गाच्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढली आहे.

अमेरिकन मीडिया रिपोर्टनुसार, माउंट प्लेजंटमध्ये काम करणारे बालरोगतज्ञ डॉ. गेराल्ड स्टेग यांनी सांगितलं की, कोरोना आणि आरएसव्ही संसर्गामुळे मुलांमध्ये श्वासोच्छवासाचा त्रास सर्वाधिक दिसून येत आहे. हे या दोन्ही विषाणूंच्या संमिश्र संसर्गाचं प्रमुख लक्षण असू शकते.

आरएसव्ही संसर्ग काय आहे? 

RSV म्हणजे ह्युमन रेस्पिरेटरी सिंसिटिअल व्हायरस इन्फेक्शन. हा संसर्ग दोन वर्षांपर्यंतच्या मुलांसह वृद्धांमध्येही आढळतो. यामध्ये रुग्णाच्या श्वासनलिकेला सूज येते आणि श्वास घेण्यास त्रास होतो. अधिर गंभीर प्रकरणात न्यूमोनिया आणि ब्रॉन्कायलाइटिसचे होऊ शकतो. RSV संसर्गाची सौम्य आणि फ्लू सारखी लक्षणे दिसू शकतात. आरएसव्ही हा विषाणू संसर्गजन्य आहे.

आरएसव्ही संसर्गाची लक्षणे कोणती आहेत? 

हिवाळ्यात फ्लूचे प्रमाण वाढणे सामान्य आहे. पण आधी कोरोना आणि त्यातच आरएसव्ही संसर्ग झाल्याच्या वाढत्या प्रकरणांमुळे आरोग्य तज्ज्ञही चिंतेत आहेत. या तीन विषाणूंच्या संमिश्र संसर्गाची काही सामान्य लक्षणे खालीलप्रमाणे आहेत.

  • ताप
  • सर्दी
  • खोकला
  • भूक न लागणे
  • शिंकणे
  • धाप लागणे
  • मळमळ
  • थंडी लागणे

 

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

महत्त्वाच्या बातम्या

World Breastfeeding Week: महिलांनो.. सिझेरियननंतरही यशस्वी स्तनपान शक्य! नवमातांच्या प्रश्नांचं उत्तर, 'ही' 7 लक्षणं, तज्ज्ञांनी सांगितले महत्त्व
महिलांनो.. सिझेरियननंतरही यशस्वी स्तनपान शक्य! नवमातांच्या प्रश्नांचं उत्तर, 'ही' 7 लक्षणं, तज्ज्ञांनी सांगितले महत्त्व
Breastfeeding Awareness week: स्तनपानाबाबतचे 'हे' 10 गैरसमज अजूनही अनेकांना वाटतात खरे; प्रत्येक नव्या आईने एकदा तरी वाचाच, डॉक्टर काय सांगतात?
स्तनपानाबाबतचे 'हे' 10 गैरसमज अजूनही अनेकांना वाटतात खरे; प्रत्येक नव्या आईने एकदा तरी वाचाच, डॉक्टर काय सांगतात?
Annual Health Checkup Benefits : वर्षातील 3 वेळचा चेक अप तुमचा रुग्णालयाचा खर्च कमी करू शकतो, रिपोर्टमध्ये खुलासा
वर्षातील 3 वेळचा चेक अप तुमचा रुग्णालयाचा खर्च कमी करू शकतो, रिपोर्टमध्ये खुलासा
Tukaram Mundhe On Majha Katta :  सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र हे आमचं मिशन, दोन महिन्यात हजारो ठिकाणी छापे, कारवायांच्या मागची भूमिका काय?
सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र हे आमचं मिशन, दोन महिन्यात हजारो ठिकाणी छापे, कारवायांच्या मागची भूमिका काय?

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Trisha Krishnan : 'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
Air India Flight Turbulence: एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
Maharashtra Goverment Cabinet Decision: पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
Arvind Kejriwal: E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
Embed widget