(Source: ECI/ABP News/ABP Majha)
America : कोरोनाविरुद्ध लढण्यात जगाला भारताची मदत, अमेरिकेकडून भारताचं कौतुक
White House on india : अमेरिकेने भारताचं कौतुक करत म्हटलं आहे की, भारत हा संपूर्ण जगासाठी लसींचा एक महत्त्वाचा उत्पादक आहे. जागतिक स्तरावर कोरोना लसींचा पुरवठा करण्यात भारताची महत्त्वाची भूमिका आहे.
India Corona Vaccine : जागतिक स्तरावर कोरोना लसींचा (Covid19 Vaccine) पुरवठा करण्यात भारताची (India) महत्त्वाची भूमिका आहे, असं म्हणत अमेरिकेने (America) भारताचं कौतुक केलं आहे. व्हाईट हाऊसने (White House) म्हटलं आहे की, भारत हा जगासाठी लसींचा एक महत्त्वाचा उत्पादक आहे. जागतिक स्तरावर कोरोना लसींचा (Cororna Vaccine Supply) पुरवठा करण्यात भारताची महत्त्वाची भूमिका आहे. व्हाईट हाऊसने जागतिक स्तरावर कोविड-19 विरुद्ध लढण्यात भारताची महत्त्वपूर्ण भूमिका मान्य करत भारताचं कौतुक केलं आहे.
भारत हा जगासाठी लसींचा एक महत्त्वाचा उत्पादक आहे, असे व्हाईट हाऊसने म्हटले आहे की, जागतिक स्तरावर कोरोना विरुद्ध लढण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक लसींचा (Coronavirus Vaccine) साठा पुरवठा करण्यात भारताने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. व्हाईट हाऊसचे कोरोना विषाणू रिस्पॉन्स कोऑर्डिनेटर डॉ. आशिष झा यांनी ही माहिती दिली आहे. मंगळवारी माध्यमांशी बोलताना पत्रकारांना ही प्रतिक्रिया दिली आहे.
United States | India has been a major exporter of vaccines because of its incredible manufacturing capacity. India is an important manufacturer of vaccines in the world: Dr Ashish Jha, White House COVID-19 Response Coordinator during a press briefing pic.twitter.com/wYhb9ym9WQ
— ANI (@ANI) October 26, 2022
पत्रकाराच्या एका प्रश्नाला उत्तर देताना डॉ. झा यांनी म्हटलं की, 'भारत हा जगासाठी कोवीड लसींचा एक महत्त्वाचा उत्पादक आहे. जागतिक स्तरावर कोरोना लसींचा पुरवठा करण्यात भारताची महत्त्वाची भूमिका आहे. भारताच्या मोठ्या उत्पादन क्षमतेमुळे भारत जागतिक पातळीवर कोरोना लसींचा प्रमुख निर्यातदार ठरला आहे.
दुसऱ्या एका प्रश्नाला उत्तर देताना डॉ. झा यांनी सांगितलं की, ऑस्ट्रेलिया, भारत, जपान आणि अमेरिका यांच्यातील क्वाड भागीदारी हा एका धोरणात्मक सुरक्षा संवाद संवाद आहे. मंगळवारी पार पडलेल्या एका पत्रकार परिषदेत, व्हाईट हाऊसचे कोरोना व्हायरस रिस्पॉन्स कोऑर्डिनेटर डॉ. आशिष झा यांनी म्हटलं की, भारताच्या मोठ्या उत्पादन क्षमतेमुळे भारत जगभरातील कोरोना लसींचा मोठा निर्यातदार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या