(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Covid19 : कोरोना रुग्ण घटले, मृत्यूची संख्या वाढली; सक्रिय रुग्ण 15 हजारांवर
Coronavirus Cases Today : देशातील कोरोनाबाधितांमध्ये कालच्या तुलनेत 105 रुग्णांची घट झाली असून 18 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
Coronavirus Cases Today in India : देशात सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्ण कमी झाले आहेत. देशातील कोरोनाबाधितांमध्ये कालच्या तुलनेत 105 रुग्णांची घट झाली असून 18 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य आकडेवारीनुसार, देशात एक हजार 216 नवीन रुग्ण आणि 18 कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर देशात सध्या 15 हजारांहून अधिक उपचाराधीन रुग्ण आहेत. काल एक हजार 321 नवीन रुग्ण आणि नऊ कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
गेल्या 24 तासांत 18 कोरोनाबाधितांचा मृत्यू
देशातील कोरोना रुग्णांची संख्या घटली असली तरी कोरोनाबळींच्या संख्येत मात्र वाढ झाली आहे. देशात गेल्या 24 तासांत 18 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. काल ही संख्या नऊ इतकी होती. त्यामुळे मृतांच्या आकडा दुपट्टीने वाढला आहे, ही चिंतेची बाब आहे. दरम्यान देशातील कोरोना संसर्ग मात्र घटला आहे. आज नव्याने नोंद झालेल्या 1216 रुग्णांमुळे भारतातील एकूण कोरोना रुग्णांचा आकडा 4 कोटी 46 लाख 58 हजार 365 इतका झाला आहे. देशात सध्या कोरोनाचे 15 हजार 705 सक्रिय रुग्ण आहेत.
कोरोनाविरुद्ध लढण्यात जगाला भारताची मदत
जागतिक स्तरावर कोरोना लसींचा (Covid19 Vaccine) पुरवठा करण्यात भारताची (India) महत्त्वाची भूमिका आहे, असं म्हणत अमेरिकेने (America) भारताचं कौतुक केलं आहे. व्हाईट हाऊसने (White House) म्हटलं आहे की, भारत हा जगासाठी लसींचा एक महत्त्वाचा उत्पादक आहे. व्हाईट हाऊसचे कोरोना विषाणू रिस्पॉन्स कोऑर्डिनेटर डॉ. आशिष झा यांनी भारताचं कौतुक केलं आहे. जागतिक स्तरावर कोरोना लसींचा (Cororna Vaccine Supply) पुरवठा करण्यात भारताची महत्त्वाची भूमिका आहे. व्हाईट हाऊसने जागतिक स्तरावर कोविड-19 विरुद्ध लढण्यात भारताची महत्त्वपूर्ण भूमिका मान्य करत भारताचं कौतुक केलं आहे.
चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा कहर
चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा वाढता कहर पाहायला मिळत आहे. शांघायमध्ये सात नवे रुग्ण सापडले आहेत. यामध्ये कोरोनाची लक्षणे असलेला एक आणि लक्षणे नसलेले सहा रुग्णांची नोंद झाली आहे. तर बीजिंगमध्ये 38 नवीन रुग्ण आढळले आहेत. चीनचे शून्य कोविड धोरण ( Zero Covid Policy ) अत्यंत अपयशी ठरलं आहे. दररोज नवीन रुग्ण आढळत असून अनेक शहरात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात आलं आहे. तर चीनच्या ग्वांगझूमध्ये 572 नवीन कोरोना रुग्ण आढळले असून त्यामधील 142 लक्षणे असलेले तर 430 लक्षणे नसलेले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या