एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Coronavirus Cases India | देशात पहिल्यांदाच एका दिवसात 1.07 लाख नव्या कोरोनाबाधितांची नोंद, सरकारकडून सतर्कतेचा इशारा

देशभरात कोरोना परिस्थिती चिंताजनक होत चालली आहे. देशात मंगळवारी तब्बल 1.07 लाखांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. पुढील चार आठवडे 'अतिशय महत्त्वाचे' असल्याचा इशारा केंद्र सरकारने दिला आहे.

नवी दिल्ली : देशभरात मंगळवारी (6 एप्रिल) तब्बल 1.07 लाखांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. एका दिवसात नोंदवलेली ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. याच दरम्यान पुढील चार आठवडे 'अतिशय महत्त्वाचे' असल्याचा इशारा केंद्र सरकारने दिला असून या महामारीची दुसरी लाट रोखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करायला हवं, असंही म्हटलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी म्हटलं की, नागरिकांनी मास्क लावण्यासारख्या खबरदारीच्या उपायाला जणू काही 'तिलांजली' दिली आहे. 

देशभरातील विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, मंगळवारी देशभरात 1.07 लाख कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. भारतात जानेवारी 2020 मध्ये महामारीला सुरुवात झाल्यापासून एकाच दिवसातील ही सर्वाधिक संख्या आहे.

तीन दिवसात दुसऱ्यांदा एक लाखापेक्षा जास्त रुग्णांची नोंद 
देशात मागील तीन दिवसात दुसऱ्यांदा एक लाखांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. भारतात रविवारी (4 एप्रिल) 24 तासात 1 लाख 03 हजार 558 नव्या रुग्णांची नोंद झाली होती. 

केंद्र सरकारने म्हटलं की, देशात कोरोनाव्हायरस मागील वर्षाच्या तुलनेत यंदा वेगाने पसरत आहे आणि नागरिकांनी महामारीची दुसरी लाट रोखण्यासाठी सहकार्य करायला हवं. केंद्र सरकारच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंगळवारी रात्री पत्रकार परिषदेत म्हटलं की देशात एकाच दिवशी एक लाखांपेक्षा जास्त नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद पुन्हा एकदा होऊ शकते आणि ही मागच्या तुलनेत अधिक असू शकते.

देशात रविवारी 1 लाख 03 लाख 558 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. तर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने काल (6 एप्रिल) सकाळी आठ वाजता जारी केलेल्या आकडेवारीनुसार मागील 24 तासात 96 हजार 982 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. 

कोरोना संसर्ग वाढल्याने महाराष्ट्रासह, दिल्लीमध्येही नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे जो 30 एप्रिलपर्यंत कायम राहिल. कोविड-19 रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे लसीकरणासाठी वयोमर्यादेची अट शिथील करण्याची मागणी केली जात आहे. मात्र सर्वाधिक धोका असलेल्या नागरिकांना सुरक्षित करणं हा उद्देश असल्याचं केंद्र सरकारने म्हटलं आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chhagan Bhujbal : शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडताच भुजबळांची फडणवीसांसाठी जोरदार बॅटिंग; म्हणाले, 132 आमदार निवडून आल्यानंतर...
शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडताच भुजबळांची फडणवीसांसाठी जोरदार बॅटिंग; म्हणाले, 132 आमदार निवडून आल्यानंतर...
S. Jaishankar and Kyoko Somekawa Love Story : जपानी महिलेशी विवाह केलेल्या परराष्ट्र मंत्री जयशंकर यांची अनोखी लव्हस्टोरी माहीत आहे का?
जपानी महिलेशी विवाह केलेल्या परराष्ट्र मंत्री जयशंकर यांची अनोखी लव्हस्टोरी माहीत आहे का?
Gondia Crime: धक्कादायक! भावाच्या हत्येचा बदला, मैत्रिणीचा वापर करत तरुणाला बोलवले, कुऱ्हाडीनं घाव घालून केली हत्या
धक्कादायक! भावाच्या हत्येचा बदला, मैत्रिणीचा वापर करत तरुणाला बोलवले, कुऱ्हाडीनं घाव घालून केली हत्या
Maharashtra Cabinet: भाजप 'ही' तीन महत्त्वाची खाती स्वत:कडेच ठेवणार, अजित पवारांचं टेन्शन वाढणार?
भाजप 'ही' तीन महत्त्वाची खाती स्वत:कडेच ठेवणार, अजित पवारांचं टेन्शन वाढणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

PuneKar on Next CM | पुणेकरांना मुख्यमंत्री कोण हवाय? वाफळता चहा; राजकारणावर गरमागरम चर्चाPunekar on CM Maharashtra  : मुख्यमंत्री कोण हवा, पुणेकरांचं मत काय...Ahilyanagar Cold Wave | नगरकर गारठले, निचांकी तापमानाची नोंद; जागोजागी शेकोट्या पेटल्याABP Majha Headlines :  10 AM : 28 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhagan Bhujbal : शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडताच भुजबळांची फडणवीसांसाठी जोरदार बॅटिंग; म्हणाले, 132 आमदार निवडून आल्यानंतर...
शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडताच भुजबळांची फडणवीसांसाठी जोरदार बॅटिंग; म्हणाले, 132 आमदार निवडून आल्यानंतर...
S. Jaishankar and Kyoko Somekawa Love Story : जपानी महिलेशी विवाह केलेल्या परराष्ट्र मंत्री जयशंकर यांची अनोखी लव्हस्टोरी माहीत आहे का?
जपानी महिलेशी विवाह केलेल्या परराष्ट्र मंत्री जयशंकर यांची अनोखी लव्हस्टोरी माहीत आहे का?
Gondia Crime: धक्कादायक! भावाच्या हत्येचा बदला, मैत्रिणीचा वापर करत तरुणाला बोलवले, कुऱ्हाडीनं घाव घालून केली हत्या
धक्कादायक! भावाच्या हत्येचा बदला, मैत्रिणीचा वापर करत तरुणाला बोलवले, कुऱ्हाडीनं घाव घालून केली हत्या
Maharashtra Cabinet: भाजप 'ही' तीन महत्त्वाची खाती स्वत:कडेच ठेवणार, अजित पवारांचं टेन्शन वाढणार?
भाजप 'ही' तीन महत्त्वाची खाती स्वत:कडेच ठेवणार, अजित पवारांचं टेन्शन वाढणार?
Sanjay Raut : ठाकरे गट BMC निवडणुकीपूर्वी मविआतून बाहेर पडणार का? संजय राऊतांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
ठाकरे गट BMC निवडणुकीपूर्वी मविआतून बाहेर पडणार का? संजय राऊतांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
Video : आरारारा...खतरनाक... चेन्नईच्या वाघानं हार्दिकला फोडला घाम, एकाच ओव्हरमध्ये पांड्याची जोरदार धुलाई; तुफान फलंदाजी पाहाच!
आरारारा...खतरनाक... चेन्नईच्या वाघानं हार्दिकला फोडला घाम, एकाच ओव्हरमध्ये पांड्याची जोरदार धुलाई; तुफान फलंदाजी पाहाच!
Pune Crime : निवडणूक संपताच पुण्यात कोयता गँग पुन्हा सक्रिय, भरदिवसा एकाला सपासप वार करुन संपवलं
निवडणूक संपताच पुण्यात कोयता गँग पुन्हा सक्रिय, भरदिवसा एकाला सपासप वार करुन संपवलं
विधानसभेचा निकाल लागताच धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाला वेग, 50 पथकं ग्राऊंडवर, किती झोपड्यांचं सर्वेक्षण पूर्ण
विधानसभेचा निकाल लागताच धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाला वेग, 50 पथकं ग्राऊंडवर, किती झोपड्यांचं सर्वेक्षण पूर्ण
Embed widget