Coronavirus : आठ महिन्यांनंतर आढळले सर्वात कमी कोरोनाबाधित, सक्रिय रुग्णांची संख्या 12 हजारांवर
Covid Pandemic : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारतात 734 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या 4,46,66,377 झाली आहे.
Coronavirus in India : जगभरात कोरोनाच्या पाचव्या लाटेचा धोका व्यक्त केला जात असताना, देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड घट झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारतात 734 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या आठ महिन्यांमधील ही सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. शनिवारी ही देशात एक हजाराहून कमी कोरोना रुग्ण आढळले होते. आज देशात 734 नवे कोरोनाबाधित आणि तीन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत एकूण 4,46,66,377 रुग्णांना कोरोना संसर्ग झाला आहे. त्यातील चार कोटीहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. सध्या देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 12 हजार 307 वर गेली आहेत.
डेंग्यू आणि गोवर आजारांचाही वाढता धोका
एकीकडे देशात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असताना दुसरीकडे इतर विषाणूजन्य आजारांचा धोका वाढताना दिसत आहे. एकीकडे देशात डेंग्यू आणि गोवर यांसारख्या आजारांनी डोकं वर काढलं आहे. याची लक्षणे ओळखून वेळीच उपचार घेणं अधिक महत्त्वाचं आहे. विशेषत: लहान मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या, कारण हिवाळ्यात त्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी होते.
Single-day rise of 734 new coronavirus infections pushes India's Covid tally of cases to 4,46,66,377, death toll climbs to 5,30,531: Govt
— Press Trust of India (@PTI_News) November 13, 2022
चीनमध्ये झिरो कोविड धोरण शिथिल
कोरोना संसर्गाचं कमी होत असल्याने चीनने नागरिकांना दिलासा देण्याची घोषणा केली आहे. चीनने कोरोनाचे काही कठोर निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय आरोग्य आयोगाने शुक्रवारी (10 नोव्हेंबर) चीनमधील कोविड-19 च्या प्रतिबंध आणि नियंत्रणात आणखी सुधारणा करण्यासाठी नवीन उपायांची घोषणा केली. चीनमध्ये झिरो कोविड धोरण शिथिल करण्यात आलं आहे. प्रवाशांसाठी क्वारंटाइन कालावधी 10 दिवसांवरून सात दिवसांवर आणण्यात आला.
India's active Covid cases have come down to 12,307 from 12,553: Union health ministry
— Press Trust of India (@PTI_News) November 13, 2022
कोविड काळात जन्मलेल्या बाळांना बोलण्यात अडचण
कोरोना विषाणू ( Covid19 ) संदर्भातील आणखी एक धोकादायक बाब समोर आली आहे. कोरोना विषाणूचा लहान मुलांवर खूप वाईट परिणाम दिसत आहे. या विषाणूमुळे मुलांच्या संवाद कौशल्यावर ( Communication Skill ) परिणाम झाल्याचं आढळून आलं आहे. कोविड काळात जन्मलेल्या बाळावर कोरोनाचा परिणाम झाल्याचं एका अभ्यासात आढळून आलं आहे. या अभ्यासानुसार, कोविड काळात जन्मलेलं बाळाचं संवाद कौशल्य ( Communication Skill ) खूपच कमकुवत होतं.