एक्स्प्लोर

Viral Disease : कोरोनासोबतच डेंग्यूही बळावतोय! दोन्हीपैंकी कोणत्या विषाणूची लागण झाली आहे 'असं' ओळखा

Covid19 Dengue : एकीकडे कोरोना संसर्ग कायम असताना दुसरीकडे डेंग्यूसारखा आजारही डोकं वर काढताना दिसत आहे.

Coronavirus Treatment vs Dengue Treatment : कोरोना विषाणूच्या संसर्ग अद्याप कायम आहे. कोरोना विषाणूचे ( Coronavirus ) नवीनवीन व्हेरियंट ( Covid19 Variant ) समोर येताना दिसत आहेत. त्यातच आता गुलाबी थंडीचा चाहूल ( Winter Season ) लागली असताना आता डेंग्यूसारखे ( Dengue ) विषाणूजन्य आजार ( Viral Disease )  बळावताना दिसत आहेत. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेची चिंता वाढली आहे. एकीकडे कोरोना विषाणू अधिक धोकादायक बनत आहे, तर दुसरीकडे डेंग्यूसारखा व्हायरल आजार डोकं वर काढत आहेत. अशावेळी लोकांना डेंग्यूची लागण झाली आहे की कोरोनाची हे समजणं कठीण जात आहे. त्यामुळे या दोन्ही रोगांची लक्षणं कशी ओळखायची जाणून घ्या.

अनेकांसमोर प्रश्न निर्माण झाला आहे की, रुग्णाला कोरोना झाला की डेंग्यू हे कसं ओळखावं? यासाठी रोगाची लक्षणं काय आहे ते पाहा.

डेंग्यू आणि कोरोना हे दोन्ही विषाणूजन्य ( Viral Disease ) आजार आहेत. ताप, थंडी वाजून येणे, डोकेदुखी आणि अंगदुखी यांसारखी लक्षणे दोन्ही रोगांमध्ये सामान्य आहेत. मात्र यामध्ये काही फरक देखील आहे. हा फरक कसा ओळखायचास ते जाणून घ्या. 

'ही' आहेत डेंग्यूची लक्षणे ( Dengue Symptoms )

अमेरिकन सीडीसीनुसार सतत उलट्या होणे, धाप लागणे, अशक्तपणा, थकवा, अस्वस्थता, यकृताचा आकार वाढणे, प्लेटलेटची संख्या वेगाने वाढणे, शरीराच्या कोणत्याही भागातून रक्तस्त्राव होणे ही डेंग्यूची प्रमुख लक्षणे आहेत.

कोरोनाची लक्षणे काय आहेत? ( Coronavirus Symptoms )

कोरोनाची अनेक लक्षणे डेंग्यूपेक्षा वेगळी आहेत. यामध्ये श्वास घेण्यास त्रास होणे, छातीत सतत दुखणे, ओठ किंवा चेहरा निळा पडणे, घशात घरघर, भ्रम होणे, झोपे संबंधित समस्या ही प्रमुख लक्षणे आहेत. दरम्यान काळानुसार या लक्षणांमध्येही बदल होत आहे. 

लक्षणे किती दिवसात दिसतात?

कोणत्याही रोगाची लक्षणे दिसण्याची वेळही ठरलेली असते. जसे की, टायफॉइडची लक्षणे दिसायला एक ते तीन आठवडे लागतात. डेंग्यूची लागण झाल्यास रुग्णाला 3 ते 10 दिवसांत लक्षणे दिसू लागतात. तर कोरोनाची लक्षणे दिसण्यासाठी 14 दिवसांचा कालावधी लागतो.

कोरोना आणि डेंग्यूच्या उपचारांमध्ये काय फरक आहे? ( Difference Between Coronavirus and Dengue )

कोरोना आणि डेंग्यूची लक्षणे वेगळी आहेत. त्याच्या उपचारातही फरक आहे. डेंग्यूमध्ये प्लेटलेट्स कमी होतात. अनेक रुग्णांना प्लेटलेट्स चढवण्याची गरज असते. प्लेटलेट्स वाढल्याने रुग्णाची प्रकृती सुधारू लागते. तर रोगप्रतिकारक शक्ती मजबूत झाल्यास कोरोनावर मात करता येते. डॉक्टरांचे औषधे, सकस आहार आणि काही मूलभूत पद्धतींची काळजी घेतल्यास कोरोनामुक्त होता येते व्यवस्थापन करता येते. डेंग्यूच्या उपचारात औषधांची आवश्यकता असते.

कोणत्या रोगाची लागण झाली आहे, हे तपासानंतरच कळेल

डेंग्यू किंना कोरोना कोणत्या रोगाची लागण झाली आहे, हे तपासातूनच स्पष्ट होईल. कोरोना आणि डेंग्यूच्या चाचणीमधून याबाबत स्पष्ट होईल.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime : 30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prayagraj Mahakumbh Delhi : महाकुंभमेळ्याला जाणाऱ्या प्रवाशांचा चेंगराचेंगरीत मृत्यू Special ReportBhaskar Jadhav on ShivSena | भास्कर जाधव नाराज, कोकणात मशाल विझणार का? Special ReportMumbai Hotel Tanduri Bhatti | मुंबईच्या हॉटेल्समधील तंदूर पदार्थांची चव बदलणार? Special ReportAjit Pawar On Dhananjay Munde | अजितदादांच्या बदलेल्या भूमिकेचा अर्थ काय? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime : 30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
सकाळी पत्रकार परिषद अन् संध्याकाळी बदललं स्टेटस; भास्कर जाधवांच्या मनातील 'म्होरक्या' कोण, शिंदे की ठाकरे?
सकाळी पत्रकार परिषद अन् संध्याकाळी बदललं स्टेटस; भास्कर जाधवांच्या मनातील 'म्होरक्या' कोण, शिंदे की ठाकरे?
Mahakumbh 2025 : राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
IPL Shedule 2025 : आयपीएल हंगामात कोण, कधी, कोणाशी भिडणार; मुंबईचे 14 सामने देशभरातली 13 मैदानं
IPL Shedule 2025 : आयपीएल हंगामात कोण, कधी, कोणाशी भिडणार; मुंबईचे 14 सामने देशभरातली 13 मैदानं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.