Covid 19 : दिलासादायक! कोरोना रुग्णांमध्ये मोठी घट, गेल्या 24 तासांत 3714 नवे रुग्ण
Coronavirus Cases Today : देशात गेल्या 24 तासांत 3714 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली असून सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
Coronavirus Cases Today in India : जगभरासह देशातही कोरोना पुन्हा डोकं वर काढू लागला आहे. कोरोना संसर्गात चढ-उतार पाहायला मिळत आहे. काल कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ झाल्यानंतर आज कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाली आहे. देशात गेल्या 24 तासांत 3714 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली असून सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 26 हजार 976 वर पोहोचली आहे. सोमवारी दिवसभरात 2513 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आदल्या दिवशी 4 हजार 518 नवीन रुग्णांची नोंद झाली होती. त्याच्या तुलनेत आज कोरोना रुग्णांमध्ये मोठी घट पाहायला मिळाली आहे.
महाराष्ट्रात 1036 कोरोना रूग्णांची नोंद, सर्वाधिक नवे रुग्ण मुंबईत
महाराष्ट्रातील कोरोनाची सक्रिय रुग्ण संख्यादेखील वाढताना दिसत आहे. महाराष्ट्रात एकूण 7429 नवे सक्रिय रुग्ण आढळले असून मुंबईत सर्वाधिक म्हणजे 5238 इतक्या सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. सोमवारी 374 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सर्वाधिक रुग्ण हे मुंबई शहरातील असून मुंबईत 676 रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात सोमवारी कोरोनामुळे कोणत्याही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
मुंबईत सोमवारी 676 नव्या रुग्णांची भर
मुंबईतील दैनंदिन कोरोना रुग्णांचा आलेख वाढता पाहायला मिळत आहे. बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, सोमवारी मुंबईत 676 नव्या रुग्णांची भर पडली आहे. सोमवारी 54 रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मागील 24 तासांत मुंबईत एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला नाही. सोमवारी 318 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
#AmritMahotsav#Unite2FightCorona#LargestVaccineDrive
— Ministry of Health (@MoHFW_INDIA) June 7, 2022
𝗖𝗢𝗩𝗜𝗗 𝗙𝗟𝗔𝗦𝗛https://t.co/o9ZqopqhpV pic.twitter.com/3y8qJcOnpM
मुंबई, ठाणेसह राज्यातील 9 जिल्ह्यांवर विशेष लक्ष देण्याची गरज
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे की, आमचे लक्ष लसीकरणावर आहे. विशेषत: बूस्टर डोसकडे दुर्लक्ष केले जाऊ नये. खबरदारीचा डोस असल्याने राज्य ते मोफत देणार नाही. दरम्यान, सध्या राज्यात कोणतेही निर्बंध नाहीत. परंतु लोकांना मास्क घालण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच मंत्रिमंडळात याबाबत काल सविस्तर सादरीकरण करण्यात आले. मुंबई आणि ठाणेसह राज्यातील 9 जिल्हे आहेत. ज्यात प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे या पाच जिल्ह्यांवर विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचं टोपे म्हणाले