(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coronavirus Cases Today : देशात आजही कोरोना रुग्णांमध्ये घट, गेल्या 24 तासात 1761 नवे रुग्ण
Coronavirus Cases Today in India : देशात गेल्या 24 तासांत कोरोना विषाणूचे एक हजार 761 नवीन रुग्ण आढळले असून 127 जणांचा मृत्यू झाला आहे. काल 2 हजार 75 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.
Coronavirus Cases Today in India : देशात आजही कोरोना विषाणूच्या नवीन रुग्णांमध्ये घट झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोना विषाणूचे एक हजार 761 नवीन रुग्ण आढळले असून 127 जणांचा मृत्यू झाला आहे. काल 2 हजार 75 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 71 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत 4 कोटी 30 लाख 7 हजार 841 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. जाणून घ्या देशातील कोरोनाची ताजी स्थिती काय आहे.
सक्रिय प्रकरणांची संख्या 26 हजार 240 इतकी कमी झाली
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, शनिवारी दिवसभरात देशात 3 हजार 196 लोक कोरोनातून बरे झाले आहेत. त्यामुळे सक्रिय रुग्णाची संख्या 26 हजार 240 इतकी झाली आहे. तसेच कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख 16 हजार 479 झाली आहे. देशात आतापर्यंत 4 कोटी 24 लाख 65 हजार 122 लोक संसर्गमुक्त झाले आहेत.
आतापर्यंत 181 कोटींहून अधिक डोस देण्यात आले
देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत कोरोना प्रतिबंधात्मक लसींचे 181 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. शनिवारी दिवसभरात 15 लाख 34 हजार 444 डोस देण्यात आले. आतापर्यंत 181 कोटी 27 लाख 11 हजार 675 डोस लसीचे डोस देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, आरोग्य कर्मचारी, कोरोना योद्धा आणि इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना 2 कोटींहून अधिक (2,17,33,502) प्रतिबंधात्मक लसीचे डोस देण्यात आले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- PM Modi : पंतप्रधान मोदींकडून जपानच्या पंतप्रधानांना खास भेट, जाणून घ्या 'कृष्णा पंखी'मध्ये काय आहे विशेष?
- होळीनिमित्त जयपूरला आलेल्या परदेशी तरुणीवर अत्याचार, पळून जाण्याच्या प्रयत्नात होता आरोपी
- Healthy Lifestyle : 'या' 10 कारणांमुळे बहुतेक लोक गंभीर आजाराला बळी पडतात, तुम्हीही दुर्लक्ष करताय का?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha