Coronavirus Cases Today : देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1421 नवे रुग्ण, 149 जणांचा मृत्यू
Coronavirus Cases Today in India : देशात गेल्या 24 तासांत कोरोना विषाणूचे 1421 नवीन रुग्ण आढळले असून 149 जणांचा मृत्यू झाला आहे. काल 1660 कोरोना रुग्णांची नोंद झाली.
Coronavirus Cases Today in India : देशात आजही कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये घट झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोना विषाणूचे 1421 नवीन रुग्ण आढळले असून 149 जणांचा मृत्यू झाला आहे. काल 1660 कोरोना रुग्णांची नोंद झाली. देशात आतापर्यंत 4 कोटी 30 लाख 19 हजार 453 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.
जाणून घ्या देशातील कोरोनाची ताजी स्थिती काय आहे.
- सक्रिय कोरोना रुग्ण : 16,187
- एकूण कोरोनामुक्त : 4,24,82,262
- एकूण कोरोनाबळी : 5,21,004
- एकूण लसीकरण : 1,83,20,10,030
सक्रिय प्रकरणांची संख्या 16 हजार 187 इतकी कमी झाली
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, शनिवारी दिवसभरात देशात 1 हजार 826 लोक कोरोनातून बरे झाले. त्यानंतर देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 16 हजार 187 झाली आहे. तर कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख 21 हजार 4 झाली आहे. देशात आतापर्यंत 4 कोटी 24 लाख 82 हजार 262 लोक संसर्गमुक्त झाले आहेत.
आतापर्यंत 183 कोटींहून अधिक डोस देण्यात आले
देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत, आतापर्यंत 13 कोटीहून अधिक कोरोना प्रतिबंधात्मक लसींचे डोस देण्यात आले आहेत. शनिवारी दिवसभरात 29 लाख 90 हजार 658 डोस देण्यात आले. आतापर्यंत 183 कोटी 20 लाख 10 हजार 30 डोस लसीचे डोस देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, आरोग्य कर्मचारी, कोरोना योद्धे आणि इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना 2 कोटींहून अधिक (2 कोटी 25 लाख 55 हजार 815) कोरोना लसी देण्यात आल्या आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- EPFO : पीएफ खातेधारकांनी लवकरात लवकर करुन घ्या ई-नॉमिनेशन, मिळतील 'हे' जबरदस्त फायदे
- Security Alert : सावधान! तुमच्या फोनमध्ये 'हे' धोकादायक अॅप आहे? फेसबुकवरून डेटा चोरतो, लगेच डिलीट करा
- RBI Recruitment 2022 : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये बंपर भरती, 'या' तारखेपासून करता येणार अर्ज
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha