एक्स्प्लोर

Security Alert : सावधान! तुमच्या फोनमध्ये 'हे' धोकादायक अ‍ॅप आहे? फेसबुकवरून डेटा चोरतो, लगेच डिलीट करा

Craftsart Cartoon Photo Tools : गुगल प्ले स्टोअरने एक धोकादायक अँड्रॉइड अ‍ॅप ब्लॉक केले आहे जे गुप्तपणे युजर्सचा फेसबुक डेटा चोरत आहे. हे अ‍ॅप प्ले स्टोअरवरून एक लाखाहून अधिक वेळा इन्स्टॉल करण्यात आले आहे.

Craftsart Cartoon Photo Tools : गुगल प्ले स्टोअर (Google Play Store) एक धोकादायक अँड्रॉईड अ‍ॅप (Android App) सापडले असून, ते युजर्सचा फेसबुक डेटा चोरत असल्याचे आढळून आले आहे. तुमचे फोटो कार्टूनमध्ये बदलणाऱ्या हे धोकादायक अ‍ॅपला Craftsart Cartoon Photo Tools आहे. हे अ‍ॅप युजर्सना त्यांचे Facebook लॉगिन वापरण्याची परवानगी घेऊन डेटा चोरतो. Google Play Store ने या अ‍ॅपवर बंदी घातली आहे, परंतु ते तुमच्या फोनमध्ये अद्यापदेखील असू शकते. हे अ‍ॅप प्ले स्टोअरवरून एक लाखाहून अधिक वेळा इन्स्टॉल करण्यात आले आहे.

'हे' अ‍ॅप कसे कार्य करते
अँड्रॉइड मालवेअरने भरलेले हे अ‍ॅप युजर्सना फोटो अपलोड करून ते कार्टूनमध्ये बदलून देते. या अ‍ॅपमध्ये Facestealer नावाचे ट्रोजन (मालवेअर) लपलेले आहे. सुरक्षा संशोधक आणि मोबाइल सुरक्षा फर्म Pradeo ने ही माहिती दिली आहे. अहवालात म्हटले आहे की, अ‍ॅप डाउनलोड केल्यानंतर, युजर्सना ते वापरण्यासाठी फेसबुकमध्ये साइन इन करावे लागेल.

मात्र, त्यात लपवलेले स्पायवेअर प्ले स्टोअरच्या सुरक्षा तपासणीलाही बायपास करते. जेव्हा युजर्स Facebook मध्ये साइन इन करतात तेव्हा मालवेअर लॉगिन क्रेडेन्शियल्स फसवणूक करणाऱ्यांना फॉरवर्ड करू शकतात. अशा प्रकारे ते वापरकर्त्यांच्या फेसबुक खात्यावर पूर्ण नियंत्रण मिळवतात. परिणामी, हॅकर्स तुमच्या प्रोफाइलचा वापर कोणत्याही चुकीच्या कामासाठी करू शकतात.

युजर्सने काय करावे?

  • तुम्हीही फोनमध्ये हे अ‍ॅप डाऊनलोड केले असेल तर लगेच डिलीट करा.
  • प्ले स्टोअरवरून कोणतेही अ‍ॅप डाऊनलोड करत असताना त्याचे रिव्ह्यू नक्की वाचा.
  • तुमचे Facebook किंवा बँक खाते तपशील कोणत्याही अनधिकृत अ‍ॅपसोबत शेअर करू नका.

महत्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 25 : दिवसभरातील टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 02 July 2024 : ABP MajhaRahul Gandhi vs PM Modi : राहुल गांधींचा वार, मोदींचा पलटवार; लोकसभेत काय घडलं?Who Is Bhole Baba : गुप्तचर विभागामधील नोकरी सोडून थ्री-पीस सूटमध्ये प्रवचन देणारे भोले बाबा?Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP  Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
Embed widget