एक्स्प्लोर

Coronavirus Updates : देशात 1940 सक्रिय रुग्ण, XBB.1.5 आणि BF.7 व्हेरियंटचे रुग्ण किती?

Coronavirus Cases Today : जगभरात कोरोनाचा वाढता संसर्घ पाहायलि मिळत असताना देशातील कोरोना संसर्गाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे.

Coronavirus Cases in India : जगभरात कोरोनाचा (Coronavirus) वाढता संसर्ग पाहायला मिळत असताना देशातील कोरोना संसर्गाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे, ही दिलासादायक बाब आहे. आज देशात 131 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. आज देशात 145 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण (Coronavirus Cases Today) सापडले होते. म्हणजे कालच्या तुलनेत आज (21 जानेवारी) 14 रुग्णांची घट झाली आहे. देशातील सक्रिय रुग्णांच्या संख्येतही घट झाली आहे. कोरोना महामारी सुरु झाल्यापासून देशात 4,46,81,781 जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. देशव्यापी कोरोना लसीकरणात 220 कोटीहून अधिक कोरोना लसी देण्यात आल्या आहेत. 

XBB.1.5 आणि BF.7 व्हेरियंटचा कहर

जगभरात कोरोनाच्या XBB.1.5 आणि BF.7 व्हेरियंटचा (Omicron Sub-Variant) संसर्ग वाढताना दिसत आहे. यासोबतच भारतातही या व्हेरियंटच्या (Coronavirus Variant) रुग्णांची संख्या वाढत आहे, ही चिंताजनक बाब आहे. मात्र, देशातील कोरोना (India Corona Updates) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होणे, ही एक दिलासादायक बाब आहे. मार्च 2020 नंतर 16 जानेवारी रोजी पहिल्यांदा देशातील कोरोना रुग्णांची संख्या 100 च्या खाली पोहोचली होती. 

आतापर्यंत 4,46 हून अधिक जणांना कोरोनाची लागण

देशात कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा चार कोटींच्या पार गेला आहे. आतापर्यंत देशात एकूण 4,46 हून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. देशात गेल्या 24 तासांत 131 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. सध्या देशात 1,940 सक्रिय रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत कोरोना विषाणूने 5 लाख 30 हजारांहून अधिक रुग्णांचा बळी घेतला आहे. 

XBB.1.5 आणि BF.7 व्हेरियंटचे रुग्ण किती?

चीन, जपान, अमेरिका आणि दक्षिण कोरियामध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. विशेषत: चीनमध्ये मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढताच आहे. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांनी विमानतळावर कोविड चाचणी (Covid Test) करण्यात येत आहे. जगभरात कोरोनाचा (Covid19) कहर पाहता खबरदारी म्हणून ही पाऊले उचलली जात आहेत. कोरोना रुग्णांचे नमुने जीनोम सिक्वेंसिंगसाठी पाठवण्यात येत आहेत. जगभरात कहर माजवणाऱ्या XBB.1.5 आणि BF.7 व्हेरियंटचे रुग्ण वाढत आहेत. देशात सध्या XBB.1.5 व्हेरियंटच्या रुग्णांची संख्या 26 वर पोहोचली आहे. याशिवाय BF.7 व्हेरियंटचे भारतात 14 रुग्ण सापडले आहेत. महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात बंगाल येथे XBB चे रुग्ण सापडले आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या

Covid-19 in China : चीन 'हॉलिवूड स्टाईल'ने करतंय कोरोनामृतांवर अंत्यसंस्कार, आईसब्युरिअल टेक्नॉलॉजी म्हणजे काय? वाचा सविस्तर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget