एक्स्प्लोर

Covid-19 in China : चीन 'हॉलिवूड स्टाईल'ने करतंय कोरोनामृतांवर अंत्यसंस्कार, आयसब्युरिअल टेक्नॉलॉजी म्हणजे काय? वाचा सविस्तर

China Corona Death : चीन सरकार कोरोना मृत्यूची आकडेवारी सतत लपवत आहे. दरम्यान, कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या अंतिम संस्काराबाबत एका मानवाधिकार कार्यकर्त्याने धक्कादायक खुलासा केला आहे.

What is Iceburial Technology : जगभरात पुन्हा एकदा कोरोना (Coronavirus) कहर पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे चीनमधील (China) जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. झिरो कोविड पॉलिसी (Zero Covid Policy) शिथिल केल्यानंतर चीनमध्ये कोरोना रुग्णांसह मृतांच्या संख्येतही वाढत आहे. चीनमध्ये कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या एवढी वाढली आहे की, हॉस्पिटल आणि शवगृहांमध्येही मृतदेह ठेवण्यासाठी उरलेली नाही. कोरोना मृत्यूच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर, चीनने आता 'हॉलिवूड स्टाईल'चा अवलंब करण्यास सुरुवात केली आहे. चीनने आता आयसब्युरियल टेक्नॉलॉजी (Iceburial Technology) आणली आहे. कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी तीन या तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. 

वुहान शहरात आयसब्युरियल टेक्नॉलॉजीची चाचणी

चीनच्या वुहान शहरात आयसब्युरियल टेक्नॉलॉजीची चाचणी केली जात आहे. जेनिफर झेंग यांनी चीनमधील कोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीबद्दल सांगताना ही महत्त्वाची माहिती दिली आहे. सध्या चीनमधील वाढत्या कोरोना मृत्यूमुळे अंतिम संस्कारांसाठी अनेक आठवड्यांपासून रांगा लावण्याची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत शी जिनपिंग प्रशासनाने आयसब्युरियल तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कोरोना मृतदेहांची विल्हेवाट लावण्याच्या योजनेवर काम सुरु केले आहे.

चीन 'हॉलिवूड स्टाईल'ने करतंय कोरोनामृतांवर अंत्यसंस्कार

90 च्या दशकात 'डेमोलिशन मॅन' हा हॉलिवूड चित्रपट आला होता, ज्यामध्ये आयसब्युरियल टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला होता. आयसब्युरियल टेक्नॉलॉजी म्हणजे, मृतदेह द्रव नायट्रोजनमध्ये उणे शंभरहून अधिक अंश तापमानात गोठवतात. त्यानंतर या गोठवलेल्या मृतदेहाची पावडर केली जाते. मानवाधिकार कार्यकर्त्या जेनिफर झेंग यांनी (Jennifer Zeng) चीनबाबत मोठा खुलासा करत या तंत्रज्ञानाची माहिती दिली आहे. 

Covid-19 in China : चीन 'हॉलिवूड स्टाईल'ने करतंय कोरोनामृतांवर अंत्यसंस्कार, आयसब्युरिअल टेक्नॉलॉजी म्हणजे काय? वाचा सविस्तर

What is Iceburial Technology : आइसब्युरिअल टेक्नॉलॉजी म्हणजे काय?

एएनआयच्या वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार, जेनिफर झेंग यांनी सांगितले की, 'वुहान शहरात आयसब्युरिअल टेक्नॉलॉजीचा वापर करत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची चाचणी केली जात आहे. यासाठी मृतदेह उणे 196 अंशांवर द्रव नायट्रोजनमध्ये गोठवले जातात आणि नंतर त्याची पावडर केली जाते.'

दरम्यान, एका ट्विटर युजरने सांगितले की, या पद्धतीचा व्हिडीओ मार्च 2022 मध्येच समोर आला होता. यावर जेनिफर यांनी सांगितले की, हा व्हिडीओ सप्टेंबर 2022 मध्ये पोस्ट केलेला असावा, म्हणजेच जेव्हा कोरोना पहिल्या टप्प्यात होता, तेव्हापासून हे तंत्रज्ञान वापरले जात असण्याची शक्यता आहे.

याआधीही झाला आहे 'या' तंत्रज्ञानाचा वापर

मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी आयसब्युरिअल तंत्रज्ञान वापरण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2016 मध्येही एका स्वीडिश आणि आयरिश कंपनीने मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी या पद्धतीचा वापर केला होता. यासाठी मृतदेह गोठवण्यासाठी द्रव नायट्रोजन आवश्यक आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या

Gene Editing Technology : चीनचा जगाला धोका? DNA मध्ये बदल करुन 'हायब्रिड सैनिक' बनवतोय चीन; काय आहे जीन एडिटिंग?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
Mahakumbh 2025 : राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
शरद पवारांनंतर ज्यांना मी आपला नेता मानतो, आव्हाडांची जयंत पाटलांसाठी खास पोस्ट; पडळकरांच्याही शुभेच्छा
शरद पवारांनंतर ज्यांना मी आपला नेता मानतो, आव्हाडांची जयंत पाटलांसाठी खास पोस्ट; पडळकरांच्याही शुभेच्छा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sushma Andhare  : पापाचे भागीदार होऊ नये म्हणून दादा सावध भूमिका घेत असतील : सुषमा अंधारेAjit Pawar On Dhananjay Munde : राजीनामा द्यायचा की नाही धनंजय मुंडेंनी ठरवावं : अजित पवारNCP News : शरद पवारांचा आमदार अजित पवारांच्या भेटीला, संदीप क्षीरसागरांना घेतली दादांची भेटSandeep Kshirsagar : जुन्नरमध्ये घेतली अजित पवारांची भेट, संदीप क्षीरसागरांना स्वतः सांगितलं कारण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
Mahakumbh 2025 : राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
शरद पवारांनंतर ज्यांना मी आपला नेता मानतो, आव्हाडांची जयंत पाटलांसाठी खास पोस्ट; पडळकरांच्याही शुभेच्छा
शरद पवारांनंतर ज्यांना मी आपला नेता मानतो, आव्हाडांची जयंत पाटलांसाठी खास पोस्ट; पडळकरांच्याही शुभेच्छा
मेट्रोखालील उड्डाणपुलास 'रतन टाटांचे नाव' द्या; मनसेचं आंदोलन, मंत्रीमहोदयांना निवेदन
मेट्रोखालील उड्डाणपुलास 'रतन टाटांचे नाव' द्या; मनसेचं आंदोलन, मंत्रीमहोदयांना निवेदन
Jaya Kishori on Mahakumbh : 'महाकुंभात डुबकी घेऊन पापं धुतली जात नाहीत, तीच पापं धुतली जातात...' जया किशोरी म्हणाल्या तरी काय?
'महाकुंभात डुबकी घेऊन पापं धुतली जात नाहीत, तीच पापं धुतली जातात...' जया किशोरी म्हणाल्या तरी काय?
Elon Musk : अवघ्या तीन दिवसांपूर्वीच पीएम मोदींची सहकुटुंब भेट अन् आज एलाॅन मस्क यांचा थेट भारताला दणका!
अवघ्या तीन दिवसांपूर्वीच पीएम मोदींची सहकुटुंब भेट अन् आज एलाॅन मस्क यांचा थेट भारताला दणका!
Nashik Crime : चॉपरने केक कापणं भोवलं, 'बर्थडे बॉय'ला नाशिक पोलिसांनी दाखवला चांगलाच इंगा
चॉपरने केक कापणं भोवलं, 'बर्थडे बॉय'ला नाशिक पोलिसांनी दाखवला चांगलाच इंगा
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.