Coronavirus Cases In India: देशात 24 तासांत कोरोना रुग्णसंख्येत वाढ... महाराष्ट्राची परिस्थिती काय?
Coronavirus Cases In India: कोरोनाचे गेल्या 24 तासांत 10 हजारांच्या जवळपास रुग्ण वाढले आहेत. तर केरळात 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
Coronavirus Cases In India: भारतात (India) कोरोनाच्या (Covid) रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. केंद्रिय आरोग्य विभागकडून बुधवारी 26 एप्रिल रोजी करोनाची आकडेवारी जाहीर करण्यात आली. या आकडेवारीनुसार, भारतात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 9,629 रुग्ण सापडले आहेत, तर 29 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. एका दिवसांत मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी दिल्लीमध्ये सहा, महराष्ट्र आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी तीन, उत्तर प्रदेश आणि ओडीसामध्ये प्रत्येकी दोन, तर गुजरात आणि केरळमध्ये (Kerala) प्रत्येकी एक असे रुग्ण आहेत. तर एकट्या केरळात 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आतापर्यंत देशात 5,31,398 रुग्णांचा मृत्यू झाला असून देशाची रुग्णसंख्या 4,43,23,045 इतकी झाली आहे.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त...
रुग्णांच्या संख्येत वाढ जरी होत असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही चांगले आहे. गेल्या चोवीस तासांत 11,967 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.68 टक्के इतके आहे. तर मृत्यूचे प्रमाण 1.18 टक्के इतके आहे. 25 एप्रिलला भारतात 6,660 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली होती.
महाराष्ट्राची स्थिती काय?
महाराष्ट्रात मंगळवारी 722 नव्या कोरोना रुग्णांचे निदान झाले. तर राज्यात मंगळवारी तीन रुग्णांची मृत्यू झाला. सोमवारी सापडलेल्या रुग्णांपेक्षा मंगळवारी सापडलेल्या रुग्ण संख्येत तिपटीने वाढ झाली आहे. आतापर्यंत राज्यात संक्रमणाची संख्या ही 81,62,842 झाली आहे. महाराष्ट्रात मंगळवारी 946 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
इतर राज्यांची परिस्थिती काय?
दिल्लीमध्ये गेल्या चोवीस तासांत 1,095 रुग्णांची नोंद झाली असून 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीचा रिकव्हरी रेट 22.74 टक्के आहे. तर सोमवारी दिल्लीत 689 रुग्णांची नोंद झाली आहे. तर तीन रुग्णांचा मृत्यू झाला होता. राजस्थानमध्ये मंगळवारी 428 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे तर तीन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, जयपूरमधून मृत्यूची आकडेवारी समोर आली आहे. ओडिसामध्ये चोवीस तासांत 393 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. ओडिसामध्ये सक्रिय रुग्णांची संख्या एकूण 3086 इतकी आहे.
देशांत रुग्ण बरे होण्याचे देखील प्रमाण समाधानकारक असल्याने काळजी करण्याचे करण्याचे कोणतेही कारण नाही. परंतु काळजी घेणे गरजेचे आहे. गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करावा. शासनाने दिलेल्या नियमावलीचे पालन करावे, असे आवाहन देखील केंद्रीय आरोग्य विभागाकडून नागरिकांना करण्यात येत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Maharashtra Corona Update : महाराष्ट्रात कोरोना चाचणीत घसरण, कोविड रुग्णांमध्ये झाली 35 टक्के घट