India Corona Update : देशात एक हजारांहून कमी कोरोना रुग्ण, 197 दिवसांनंतर सर्वात कमी रुग्णांची नोंद
Coronavirus Today in India : देशात सणासुदीच्या पार्श्वभूमीवर चांगली बातमी समोर आली आहे. देशात सुमारे सहा महिन्यांनंतर सर्वात कमी कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.
Coronavirus Cases Today in India : देशात सणासुदीच्या पार्श्वभूमीवर चांगली बातमी समोर आली आहे. देशात सुमारे सहा महिन्यांनंतर सर्वात कमी कोरोना रुग्णांची (India Corona Update) नोंद झाली आहे. देशात आज 830 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. 197 दिवसांनंतर देशात सर्वात कमी रुग्ण सापडले आहेत. या आधी सर्वात कमी रुग्ण एप्रिल (April Month) महिन्यात आढळून आले होते. गेल्या 24 तासांत एका रुग्णाचा कोरोना संसर्गमुळे मृत्यू झाला आहे. शास्त्रज्ञांकडून पाचव्या कोरोना लाटेचा (Corona Wave) धोका व्यक्त करण्यात येत असताना रुग्णसंख्येत झालेली ही घट एक दिलासादायक बाब आहे.
सक्रिय रुग्ण 21 हजारांवर
देशातील सक्रिय कोविड रुग्णांची संख्या कमी झाली आहे. देशातील कोरोना उपचाराधील रुग्णांची संख्या 22 हजार 549 या आकड्यावरून 21 हजार 607 इतकी घसरली आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही नवी आकडेवारी दिलेली आहे. एका दिवसात 830 कोरोनाबाधितांची वाढ आहे. त्यामुळे भारतातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 4 कोटी 46 लाख 45 हजार 768 वर पोहोचली आहे. देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 5 लाख 28 हजार 981 वर पोहोचली आहे.
Single-day rise of 830 COVID-19 cases pushes India's tally to 4,46,45,768, death toll climbs to 5,28,981: Union health ministry
— Press Trust of India (@PTI_News) October 26, 2022
कोरोनाविरुद्ध लढण्यात जगाला भारताची मदत
भारत जगभरातील देशांना कोरोना प्रतिबंधात्मक लसींचा पुरवठा करतो. या पार्श्वभूमीवर अमेरिकेने (America) भारताचं कौतुक केलं आहे. जागतिक स्तरावर कोरोना लसींचा (Covid19 Vaccine) पुरवठा करण्यात भारताची (India) महत्त्वाची भूमिका आहे, असं अमेरिकेने म्हटलं आहे. व्हाईट हाऊसने (White House) म्हटलं आहे की, भारत हा जगासाठी लसींचा एक महत्त्वाचा उत्पादक आहे. जागतिक स्तरावर कोरोना लसींचा (Cororna Vaccine Supply) पुरवठा करण्यात भारताने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. व्हाईट हाऊसने जागतिक स्तरावर कोविड-19 विरुद्ध लढण्यात भारताची महत्त्वपूर्ण भूमिका मान्य करत भारताचं कौतुक केलं आहे.
#AmritMahotsav#Unite2FightCorona#LargestVaccineDrive
— Ministry of Health (@MoHFW_INDIA) October 26, 2022
𝗖𝗢𝗩𝗜𝗗 𝗙𝗟𝗔𝗦𝗛https://t.co/RDrPi4WaWw pic.twitter.com/EyTFPJAY8e