एक्स्प्लोर
कोरोना संकटात भारतातील मोठ्या मेट्रो शहरातील प्रवासी अधिक जागरूक ; आयआयटी रिसर्च
कोरोनाच्या संकटात मुंबई आयआयटी आणि हैदराबाद आयआयटीमधील संशोधकांनी रोजच्या प्रवाशांवर मार्चचा तिसरा आठवडा आणि जनता कर्फ्यू दरम्यान नेमका काय परिणाम झाला? यावर संशोधन केले.
मुंबई : आयआयटी आणि हैदराबाद आयआयटीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे झालेल्या लॉकडाऊन झाल्यानंतर आणि लॉकडाऊनपूर्वीच्या दिवसात रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा सर्व्हे केला आहे. यामध्ये कोरोनाबाबतची नागरिकांमधील जागरूकता टियर 1 म्हणजेच मुंबई, दिल्ली, हैदराबाद, पुणे सारख्या मोठ्या मेट्रो शहरात जास्त दिसून येत असल्याचे समोर आले आहे. टियर 3 म्हणजे विकसनशील शहरे होय.
कोरोनाच्या संकटात मुंबई आयआयटी आणि हैदराबाद आयआयटीमधील संशोधकांनी रोजच्या प्रवाशांवर मार्चचा तिसरा आठवडा आणि जनता कर्फ्यू दरम्यान नेमका काय परिणाम झाला? यावर संशोधन केले. यासाठी 1900 पेक्षा जास्त लोक या ऑनलाइन सर्व्हेमध्ये सहभागी करण्यात आले होते.
संशोधकांच्या म्हणण्यानुसार लॉकडाऊनबाबत सरकारचा कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी महत्वचा होता. या निर्णयामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर पसरण्याची भीती कमी झाली आणि परिणामी सार्वजनिक वाहतुकीमध्ये बस, ट्रेन, मेट्रोमधील गर्दी कमी करण्यात मदत झाली.
महामारीच्या काळात प्रवाशांनी स्वतःहून कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यावे यासाठी घेतलेल्या निर्णयाचा अभ्यास या संशोधनात करण्यात आला आहे. हैदराबाद आयआयटीचे सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाचे प्राध्यापक डॉ. दिग्विजय पवार, डॉ. प्रिथा चॅटर्जी, मुंबई आयआयटीचे प्राध्यापक नागेंद्र वेलगा, अंकित कुमार या टीमने हे संशोधन केले आहे.
यामध्ये जे प्रवासी रोज प्रवास करतात अशा लोकांच्या लॉकडाऊनआधी आणि लॉकडाऊननंतर नेमका काय फरक पडला याबाबतची माहिती प्रश्न विचारून गोळा केली आहे. यामध्ये 1900 पेक्षा जास्त लोक सहभागी झाले असून यामध्ये 63.6 टक्के प्रतिसाद टियर 1 शहरामधून मिळाला तर 20.6 टक्के प्रतिसाद हा टियर 2 शहरांमधून मिळाला तर 15 टक्के प्रतिसाद हा टीयर 3 म्हणजेच कमी लोकसंख्या असलेल्या शहरांमधून मिळाला आहे.
याबाबत संशोधनात टियर 1 मेट्रो शहरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना तिसऱ्या आठवड्यात म्हणजेच लॉक डाऊनच्या काळात 12 टक्के लोकांनी सार्वजनिक वाहनांचा वापर कमी करून खाजगी वाहनांचा वापर केला आहे. तर टीयर 2 शहरांमध्ये 7 टक्के लोकांनी खाजगी वाहन वापरायला सुरवात केली. यामध्ये मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात 48 टक्के लोकांनी कामासाठी प्रवास करणे बंद करून टाकले तर 28 टक्के लोकांनी आपला कामाला जाण्यासाठीचा प्रवास सुरु ठेवला.
या काळात 18 टक्के लोकांनी महत्वचा कामासाठी जात असताना आपल्या फ्लाइट्स कॅन्सल केल्या तर 20 टक्के लोकांनी रेल्वे रिझर्व्हेशन रद्द केले आहे. त्यामुळे याबाबतची जागरूकता ही मुंबई, दिल्ली, हैद्राबाद सारख्या मोठ्या मेट्रो शहरात जास्त पाहायला मिळाली आहे. यापुढील संशोधन हे कोरोनामुळे वाहतुकीवर नेमके कसे परिणाम झाले यावर केले जाणार आहे.
संबंधित बातम्या :
India Lockdown | लॉकडाऊनचा पर्यावरणावर सकारात्मक परिणाम; राज्यातील अनेक शहरात प्रदूषणाची पातळी घटली
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
व्यापार-उद्योग
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement