(Source: Poll of Polls)
India Lockdown | इस्लामपूरात दानशूर व्यक्तींनी 'माणुसकीचं नातं' निभावलं; 500 गरजूंना जेवण वाटप
कोरोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर इस्लामपूर शहरातील विविध दानशूर व्यक्ती एकत्र येत 'माणुसकीचं नातं' हा अनोखा उपक्रम राबवत आहे. या उपक्रमांतर्गत जवळपास 500 गरजूंना दररोज जेवण वाटप केले जात आहे. खरंतर इस्लामपूर शहरावर कोरोना विषाणूचे भीषण संकट उभे राहिलेले आहे.
सांगली : इस्लामपूर येथे कोरोनाचे 25 रुग्ण आढळल्यामुळे शहरातील संपूर्ण परिसर सील केला. तसेच लॉकडाऊनचे काटेकोर पालन होत आहे. मात्र या कठीण काळात अनेक गरजू बांधवांवर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे याच्या पुढाकारातून इस्लामपूर शहरातील काही दानशूर व्यक्तींनी माणुसकीचं नातं हा उपक्रम 15 एप्रिलपर्यंत राबवला जाणार आहे. या उपक्रमाअंतर्गत हातावर पोट असलेल्या लोकांना सकाळ-संध्याकाळ जेवण देण्याचे काम केले जात आहे.
कोरोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर इस्लामपूर शहरातील विविध दानशूर व्यक्ती एकत्र येत 'माणुसकीचं नातं' हा अनोखा उपक्रम राबवत आहे. या उपक्रमांतर्गत जवळपास 500 गरजूंना दररोज जेवण वाटप केले जात आहे. खरंतर इस्लामपूर शहरावर कोरोना विषाणूचे भीषण संकट उभे राहिलेले आहे. इस्लामपूर शहरातील 25 लोक कोरोना बाधित झालेले आहेत. या पार्श्वभूमीवर इस्लामपूर शहरांमध्ये भयान शांतता आहे. जे लोक मध्यमवर्गीय-उच्च मध्यमवर्गीय आहेत, त्यांच्या अन्न-वस्त्र-निवारा या गरजांची पूर्तता होत आहे. परंतु झोपडपट्टीमध्ये राहणारे जे लोक आहेत अशा लोकांच्या दोन वेळच्या जेवणाची भ्रांत निर्माण झालेली आहे. दिवसभर काम केल्यानंतर पोटाची खळगी भरू शकतात असे अनेक लोक इस्लामपूर शहरांमध्ये आहेत.
इस्लामपूर पोलिसांनी याचे एक सर्वेक्षण केलं आहे. या सर्वेक्षणामध्ये त्यांना असे आढळले आहे की, इस्लामपूर व इस्लामपूर नजीकच्या उपनगरांमध्ये काही झोपडपट्ट्यांमध्ये 346 माणसं आहेत. की ज्यांना दोन वेळच्या जेवणाची काळजी आहे. अशा लोकांना माणुसकीच्या नात्याने मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. महापुराचे अस्मानी संकटही या लोकांनी असेच झेलले होते. आता या संकटाच्या दरम्यानही अनेक लोकांना मदत करायची आहे. मात्र ते लोक घाबरून बाहेर येत नाहीत आणि झोपडपट्टीमध्ये लोक उपाशी राहत आहेत आणि जेवणासाठी इकडेतिकडे फिरत आहेत. अशा लोकांना मदत करण्यासाठी या ग्रुपची रचना केले गेली. या ग्रुपमध्ये निस्पृहपणे मदत करणारे लोक आहेत. 346 लोकांच्या दुपारच्या आणि संध्याकाळच्या जेवणाची व्यवस्था करायची आहे. त्याच्यामध्ये आपण त्यांना मसालेभात दिला जातो. इस्लामपूर शहरांमधील प्रसिद्ध उद्योजक, समाजभान जपून काम करणारा माणूस म्हणून ज्यांना पाहिलं जातं असे सर्जेराव यादव यांच्या पुढाकारामुळे महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
पाहा व्हिडीओ : ...तर सैन्य बोलावणं हा शेवटचा पर्याय : शरद पवार
गेल्या रविवार पासून आम्ही पोलीस शहरात फिरत आहोत. हातावर पोटं असणारे अनेक लोक चिंतातूर दिसत होते तसेच अन्न मागून खाणे याच्यापालिकडचा कोणताच उपाय त्या बिचाऱ्यांकडे नव्हता. काही लोक शहरातील अपार्टमेंट आणि कॉलन्यामध्ये जेवण मागत फिरत होते. आज सकाळी लमाण तांड्यामधील काही लोक गांधी चौकाच्या परिसरात अन्नासाठी भटकत होते, त्यांना विचारणा केली असता त्यांनी धक्कादायक उत्तर दिले, "भूक लागली म्हणून काहीतरी मिळतंय का? हे पाहण्यासाठी आलो आहे",असे उत्तर मिळाले. यातील अनेक लोक उत्तर प्रदेश, बिहार, बीड, जालना, जत येथे आहेत, ज्यांची येथील रेशन कार्डही बहुदा नसावीत. त्यामुळे 2 रुपये तांदूळ आणि 3 रुपये गहू त्यांना मिळण्याची शक्यता कमी वाटत होती. म्हणूनच हा विचार डोक्यात आला.
'माणुसकीचं नातं' हा ग्रुप प्रत्येक गरजू, गरीब, शोषित, वंचित आणि उपेक्षित अशा प्रत्येकाचा आधारवड आहे. लॉकडाऊन आणखी 2 महिने चालला तरी 'माणुसकीचं नातं' सर्वांना जरूर मदत करत राहील. 15 एप्रिलपर्यंत सर्व हाऊसफुल्ल झाले आहे. आणखी तीस-चाळीस लोक वेटिंग वर आहेत. माणुसकीच्या नात्याचा हा जीवंत झरा या परिस्थितीत सर्व भागात तयार होवो आणि तो असाच अखंड वाहत राहील अशीच अपेक्षा करावी.
संबंधित बातम्या :
आंबेडकर जयंती आणि शब-ए-बारातबाबत शरद पवार यांचं आवाहन
Coronavirus | लॉकडाऊनमुळे पुणे, ठाण्यासह अनेक शहरांच्या हवेची गुणवत्ता सुधारली
Azim Premji | अझीम प्रेमजींची दरियादिली, 1125 कोटींची मदत करणार