Corona Vaccination : कोरोनाच्या लसीच्या एका डोससाठी 250 रुपये लागणार, केंद्र सरकारकडून दर निश्चित
आरोग्य मंत्रालयाने सांगितलं होते की, सर्व लाभार्थ्यांना स्वतःचे फोटो ओळखपत्र, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र इत्यादीसह लसीकरण केंद्रात जावे लागेल.

नवी दिल्ली : उद्यापासून देशभर कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु होत आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि फ्रन्टलाईन वर्कर्सना लसीकरण करण्यात आलं. दुसऱ्या टप्प्यात सामान्य नागरिकांना लस देण्यात येणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारने कोरोना लसीची किंमत निश्चित केली आहे. सरकारने त्याची किंमत 250 रुपये निश्चित केली आहे. खासगी रुग्णालये कोरोनाच्या लसीच्या प्रत्येक डोसाठी 250 रुपये शुल्क आकारू शकतात. म्हणजे एकूण दोन डोससाठी 500 लागतील. 1 मार्चपासून देशात 60 वर्षांपेक्षा जास्त व 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या गंभीर आजारांनी ग्रस्त लोकांना लस देण्याची तयारी सुरु आहे. कोरोनाची लस सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत दिली जाणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना लसीसाठी जास्तीत जास्त फी 250 रुपये असेल. ज्यामध्ये लसीची किंमत 150 रुपये आणि 100 रुपये सेवा शुल्क असणार आहे. पुढील आदेश होईपर्यंत ही किंमत तशीच राहील. सूत्रांच्या माहितीनुसार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना याबाबत माहिती देण्यात आली आहे.
Corona Vaccination : ऑनलाईल नोंदणी केली नसेल तर कोरोनाची लस मिळणार का?
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले की, 'ऑन-साइट' नोंदणीची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. जेणेकरून पात्र लाभार्थी त्यांच्या आवडीच्या लसीकरण केंद्रात जाऊन त्यांची नोंदणी करुन लस घेतील. लसीचे लाभार्थी को-विन 2.0 पोर्टल डाउनलोड करून तसेच आरोग्य सेतूसारख्या मोबाइल अॅप्सद्वारे प्रथम नोंदणी करू शकतात.
आरोग्य मंत्रालयाने सांगितलं होते की, सर्व लाभार्थ्यांना स्वतःचे फोटो ओळखपत्र, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र इत्यादीसह लसीकरण केंद्रात जावे लागेल. त्याच वेळी, 45 वर्षापेक्षा जास्त वयाचा लाभार्थी कोणत्याही रोगाने ग्रस्त असल्यास, रोगाशी संबंधित प्रमाणपत्र देखील आणावे लागेल. ज्यावर नोंदणीकृत डॉक्टरची सही गरजेची असेल.
Mumbai Corona Update | मुंबईमधील चाळी, झोपडपट्ट्यांची वाटचाल कन्टेन्मेंट झोन मुक्तीकडे
नोंदणी न केल्यास लस मिळणार का?
लसीकरणासंदर्भात यावेळी सर्वात मोठा प्रश्न असा आहे की जे नोंदणी करत नाहीत त्यांना लस मिळणार की नाही? ऑनलाईन नोंदणी व्यतिरिक्त लोकांना 'वॉक इन रजिस्ट्रेशन' ची सुविधा देखील देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्यांना मोबाईल जास्त हाताळता येत नाही किंवा ऑनलाईन नोंदणी करता नाही, ते थेट रुग्णालयात जाऊन ही लस घेऊ शकतात. मात्र ऑनलाईन नोंदणी किंवा अॅपद्वारे नोंदणी करणाऱ्यांना प्रथम प्राधान्य दिले जाईल असं बोललं जात आहे.
EXPLAINER VIDEO | एक मार्चपासून कोरोना लस दोनशे पन्नास रुपयात कुठे, कशी आणि कोणाला मिळणार?
इतर बातम्या :























