Covid-19 Vaccination : बालकांच्या लसीकरणाबाबत मोठी बातमी, 12 ते 14 वयोगटातील मुलांचे लसीकरण मार्चमध्ये होण्याची शक्यता
Covid-19 Vaccination : भारतातील 12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना कोरोनाची लस देण्यास भारताच्या ड्रग कंट्रोलर जनरलने मान्यता दिली आहे.
Covid19 Vaccination : देशात 15 ते 18 वयोगटातील अल्पवयीन मुलामुलींचं कोरोना लसीकरण सुरु आहे. कोविन पोर्टलनुसार, आतापर्यंत 3,45,35,664 जणांना लसींचा पहिला डोस देण्यात आला आहे. या वयोगटात सुमारे साडेसात कोटी मुले आहेत. 15 ते 17 वयोगटातील मुलांमध्ये वेगाने लसीकरण होत असून फेब्रुवारी अखेरीस लसीकरण पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यानंतर 12 ते 14 वयोगटातील बालकांचे लसीकरण सुरू करता येईल.
भारतातील 12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना कोरोनाची लस देण्यास ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने मान्यता दिली आहे. भारत बायोटेकची कोवॅक्सीन (Covaxin) 12 ते 18 वर्षे वयोगटात दिली जाऊ शकते. सध्या ही लस 15 ते 17 वयोगटाला दिली जात आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि एनटीजीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्चपर्यंत 15 ते 17 वयोगटातील बालकांचे लसीकरण झाल्यानंतर 12 ते 14 वयोगटातील बालकांचे लसीकरणही सुरू होऊ शकते आणि त्यासाठी लस उपलब्ध करून दिली जात आहे. राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार समिती बैठकीत लसीकरणाबाबत निर्णय घेईल.
या वर्षाच्या सुरुवातीपासून 15 ते 18 वयोगटातील बालकांचे लसीकरण सुरू झाले आहे. देशात 15 ते 18 वयोगटातील आठ कोटी मुले आहेत, तर सुमारे 65 दशलक्ष शालेय मुले आहेत. आतापर्यंत 15 ते 18 वर्षे वयोगटातील आठ लाख मुलांची कोविन (CoWIN) अॅपवर नोंदणी झाली आहे.
इतर बातम्या :
- Coronavirus New Cases : कोरोनाचा वाढता धोका! गेल्या 24 तासात 2 लाख 58 हजार नवे रुग्ण, 385 मृत्यू
- Omicron : देशात कोरोनाचा कहर, ओमायक्रॉनचा संसर्गही कायम; महाराष्ट्र, दिल्लीत रुग्णवाढ मंदावली
- Coronavirus : चहा ऐवजी 'या' तीन काढ्यांचे करा सेवन, संसर्गापासून होईल संरक्षण, चवही कायम
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha