Coronavirus New Cases : कोरोनाचा वाढता धोका! गेल्या 24 तासात 2 लाख 58 हजार नवे रुग्ण, 385 मृत्यू
Coronavirus Cases in India : देशात कोरोना विषाणूचे 2 लाख 58 हजार 89 नवीन रुग्ण आढळून आले आहेत आणि गेल्या 24 तासात 1 लाख 51 हजार 740 बरे झाले आहेत. तर, 385 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
Coronavirus Cases in India : देशात कोरोनाचा अनियंत्रित वेग कायम आहे. देशात गेल्या 24 तासात कोरोना विषाणूचे 2 लाख 58 हजार 89 नवीन रुग्ण आढळून आले आहेत आणि भारतात गेल्या 24 तासात 1 लाख 51 हजार 740 बरे झाले आहेत. तर, 385 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या नवीन रुग्णांसह देशातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या आता 16 लाख 56 हजार 341 वर पोहोचली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 4 लाख 86 हजार 451 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर देशातील ओमायक्रॉन बाधितांची एकूण रुग्णांची संख्या 8 हजार 209 इतकी झाली आहे. भारतात लसीकरण मोहीम वेगाने चालविली जात आहे. आतापर्यंत 157 कोटींहून अधिक लसीचे डोस देण्यात आले आहेत.
महाराष्ट्रात रविवारी दिवसभरात कोरोना संसर्गाचे 41, 327 नवे रुग्ण आढळून आले असून आणखी 29 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी राज्यात 42,462 संसर्गाची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात 40,386 कोरोनारुग्ण संसर्गमुक्त झाले असून, आतापर्यंत राज्यात 68,00,900 लोक बरे झाले आहेत. उपचाराधीन रुग्णांची संख्या 2,65,346 इतकी आहे. राज्यातील एकूण कोरोनारुग्णांची संख्या 72,11,810 झाली असून मृतांची संख्या 1,41,808 वर पोहोचली आहे. एका दिवसात ओमायक्रॉन व्हेरियंटचे आठ नवे रुग्ण आढळल्याने एकुण ओमायक्रॉनबाधितांची संख्या 932 वर पोहोचली आहे. राज्यात कोरोना संसर्ग मृत्यूदर 1.96 टक्के आहे तर संसर्गातून बरे होण्याचे प्रमाण 94.3 टक्के आहे.
केंद्र सरकारच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, लक्षणे नसलेल्या लोकांची चाचणी करण्याची गरज नाही. तसेच, प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळून आलेल्या लोकांच्या संपर्कात आलेल्या लोकांची चाचणी देखील कोणताही आजार असल्यास किंवा 60 वर्षांपेक्षा जास्त वय असल्याशिवाय करण्याची गरज नाही. सत्येंद्र जैन म्हणाले की, तपासाबाबतची ही नवीन मार्गदर्शक तत्त्वे काळजीपूर्वक विचार करून जारी करण्यात आली आहेत. ज्यांची चौकशी व्हायला हवी, त्यांची चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- देशात कुणावरही कोरोना लसीची सक्ती नाही, केंद्र सरकारचं सर्वोच्च न्यायालयात स्पष्टीकरण
- Coronavirus : चहा ऐवजी 'या' तीन काढ्यांचे करा सेवन, संसर्गापासून होईल संरक्षण, चवही कायम
- Winter Care Tips : ग्लिसरीन त्वचेसह वाढवते केसांचे सौंदर्यच, हिवाळ्यात असा करा वापर
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha