Corona Vaccination : देशात कोरोना लसीकरणाचा रेकॉर्ड ब्रेक, 50 कोटींचा टप्पा ओलांडला
Corona Vaccination : देशातील कोरोनाच्या लसीकरणाच्या कार्यक्रमाला गती मिळत असून आतापर्यंत 0 कोटी 3 लाख 48 हजार 866 डोस देण्यात आले आहेत.
नवी दिल्ली : भारतातल्या लसीकरणाच्या मोहिमेमध्ये आतापर्यंत कोरोनाच्या लसीचे 50 कोटी डोस देण्याचा विक्रम झाला आहे. यामध्ये लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या डोसचाही समावेश आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या वृत्तानुसार, देशात आतापर्यंत कोरोनाच्या लसीचे 50 कोटी 3 लाख 48 हजार 866 डोस देण्यात आले आहेत. देशात 21 जून पासून 18 वर्षावरील सर्वांच्या लसीकरणाला सुरुवात झाली.
शुक्रवारी एकाच दिवशी देशात 43.29 लाख डोस देण्यात आले. त्यामध्ये 22 लाख 93 हजार लोकांना कोरोनाच्या लसीचा पहिला डोस देण्यात आला असून 4 लाख 32 हजार लोकांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला. तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत 17 कोटी 23 लाख लोकांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला असून एक कोटी 12 लाख लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे.
#LargestVaccineDrive #Unite2FightCorona @PMOIndia @mansukhmandviya @ianuragthakur @DrBharatippawar @PIB_India @mygovindia @COVIDNewsByMIB @ICMRDELHI @DDNewslive @airnewsalerts pic.twitter.com/YoOulsdBGk
— Ministry of Health (@MoHFW_INDIA) August 6, 2021
देशभरात महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये कोरोनाच्या लसींचे एक कोटीहून अधिक डोस देण्यात आले आहेत.
देशभरात लसीकरण मोहीम 16 जानेवारीपासून सुरु करण्यात आली. 2 जानेवारीपासून फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांचे लसीकरण सुरु झाले. कोरोना लसीकरणाचा पुढील टप्पा 1 मार्चपासून सुरु झाला, ज्यामध्ये 60 वर्षापेक्षा जास्त वयाच्या नागरिकांसोबत 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना ज्यांना गंभीर स्वरुपाचे आजार आहेत, अशा लोकांचे लसीकरण सुरु झाले. त्याचवेळी, 1 एप्रिलपासून 45 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील प्रत्येकासाठी लसीकरण सुरु करण्यात आले. तर 1 मे पासून 18 ते 44 वर्षे वयोगटातील लोकांचे लसीकरण सुरु झाले आहे. देशात 21 जून पासून 18 वर्षावरील सर्वांच्या लसीकरणाला सुरुवात झाली.
देशात कोरोनाच्या प्रादुर्भावाला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत तीन कोटी 18 लाख 12 हजार रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 26 हजार 290 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, 3 कोटी 9 लाख 74 हजार रुग्ण आतापर्यंत उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत.
महत्वाच्या बातम्या :