Corona : पाच राज्यांच्या निवडणुकीवर कोरोनाचे सावट; निवडणूक आयोगाने AIIMS-ICMRकडून मागवल्या सूचना
Election Commission Meeting: या वर्षी होणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने AIIMS-ICMR या संस्थांकडून सूचना मागवल्या आहेत.
नवी दिल्ली : या वर्षीच्या सुरुवातीला पाच राज्यांच्या निवडणुका होणार आहे. पण देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ होत असल्याने या निवडणुका कशा घ्यायच्या, त्याचे नियोजन कसे करायचे असा प्रश्न केंद्रीय निवडणूक आयोगासमोर उभा आहे. त्या संदर्भात आता केंद्रीय निवडणूक आयोगाने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाशी चर्चा केली आहे. तसेच AIIMS-ICMR या संस्थांकडून सूचना मागवल्या आहेत.
पाच राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकीसंबंधी केंद्रीय निवडणूक आयोगाची आजही एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला केंद्रीय आरोग्य सचिव उपस्थित होते. त्यांनी देशातील कोरोनाच्या ताज्या आकडेवारीची माहिती निवडणूक आयोगाला दिली. तसेच या संबंधित अनेक विषयांवर चर्चाही केली.
देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहेत. त्यातच ओमायक्रॉनच्या संकटाचे ढगही घोंगावत आहे. ही परिस्थिती येत्या काही दिवसांमध्ये नियंत्रणात आली नाही तर पाच राज्यांच्या निवडणुकीची तयारी कशी करायची, त्याचे नियोजन कसे करायचे असा प्रश्न केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासुन केंद्रीय निवडणूक आयोगाकडून बैठकीचं आयोजन करण्यात येत आहे.
दरम्यान, देशात गेल्या 24 तासांत कोरोना व्हायरसच्या 90 हजार 928 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. अशातच 325 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच देशात कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येचा विस्फोट झाला आहे. दैनंदिन रुग्णसंख्येत जवळपास 56 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :