सावधान! येता आठवडा धोक्याचा, प्रशासनाकडून काळजी घेण्याचं आवाहन
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे सर्वांचीच चिंता वाढली आहे. त्यात येत्या काही दिवसांत ही संख्या अजून वाढण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
मुंबई : कोरोनाची वाढती रुग्ण संख्या ही सर्वांसाठीच डोकेदुखी ठरणार आहे. बुधवारी तर राज्यात 26 हजाराच्या घरात आणि मुंबईत 15 हजारांहून अधिक कोरोनाबाधित आढळले. ही आकडेवारी अत्यंत धक्कादायक असून मुंबईतील आतापर्यंतची ही सर्वात विक्रमी आकडेवारी आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात ही आकडेवारी आणखी मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं राज्याचे आरोग्य विभागाकडून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने सर्वांचीच चिंता वाढली आहे. कारण रुग्ण वाढीचा दर झपाच्याने वाढत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाचे सचिव प्रदीप व्यास यांनी सर्व जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना सतर्कतेचा इशारा देणार पत्र लिहीले होते. या महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात सक्रिय रुग्ण संख्या ही दोन लाखांवर जाऊ शकते आणि येणाऱ्या या तिसऱ्या लाटेत कोविड रुग्नांची संख्या 80 लाखांपर्यंत जाऊ शकते, असा इशारा देण्यात आला होता. त्याप्रमाणेच आता रुग्ण वाढत असल्याने ही सर्व आकडेवारी खरी ठरू शकते याची शक्यता नाकारता येत नाही.
'आज कोरोनाबाधितांची संख्या 20 हजार पार जाण्याची शक्यता'
बुधवारी 15 हजारांहून अधिक रुग्ण आढळल्यानंतर आता आज (गुरुवारी) ही संख्या 20 हजारांच्या पार जाऊ शकते अशी शक्यता टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी एक ट्वीट करत ही शक्यता वर्तविली असून या ट्वीटमध्ये त्यांनी सर्वांना मास्क वापरुन काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
मागील चार दिवसांतील कोरोना आकडेवारी
1 जानेवारी - राज्यात 9 हजार 170 तर मुंबईत 6 हजार 347 नवे रुग्ण
2 जानेवारी- राज्यात 11 हजार 877 तर मुंबईत 8 हजार 63 नवे रुग्ण
3 जानेवारी- राज्यात 12 हजार 160 तर मुंबईत 8 हजार 82 नवे रुग्ण
4 जानेवारी- 18 हजार 166 तर मुंबईत 10 हजार 860 नवे रुग्ण
5 जानेवारी- राज्यात 26 हजार 538 तर मुंबईत 15 हजार 166 नवे रुग्ण
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Maharashtra Coronavirus Lockdown : राज्यात लॉकडाऊन लागणार? आरोग्यमंत्र्यांनी सांगितला ठाकरे सरकारचा निर्णय
- Lockdown : भारतात तिसऱ्या लाटेचं तांडव? जानेवारी महिन्यात पीक पॉईंट ; शास्त्रज्ञांचा अंदाज
- परवानगीशिवाय खासगी रुग्णालयांत कोरोनाबाधितांना भरती करण्यास मनाई, BMC चा मोठा निर्णय
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह