Ram Temple Foundation Day : काळी कपडे घालून आंदोलन केल्यावरून अमित शाहांचा काँग्रेसवर निशाणा, म्हणाले...
Ram Temple Foundation Day : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या दिवशी राम मंदिराची पायाभरणी केली होती. त्यामुळे काँग्रेसने आज काळ्या कपड्यात आंदोलन करून आम्ही रामजन्मभूमीला विरोध करत असल्याचे दाखवून दिले, अशी टीका अमित शाह यांनी केलीय.
Ram Temple Foundation Day : "काँग्रेसने गुपचूप पद्धतीने प्रकरण पुढे केले आहे. काँग्रेसने आज आंदोलन का केले? आज ईडीनेही चौकशी केली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या दिवशी राम मंदिराची पायाभरणी केली होती. त्यामुळे काँग्रेसने आज काळ्या कपड्यात आंदोलन करून आम्ही रामजन्मभूमीला विरोध करत असल्याचे दाखवून दिले, अशी टीका गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसच्या आजच्या आंदोलनावर केलीय.
देशातील वाढती महागाई आणि बेरोजगारीवरून काँग्रेसने आज देशभर निदर्शने केली. यानंतर काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह अनेक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी अमित शहा यांनी राहुल गांधींवर टीका केलीय.
"काँग्रेसने निषेध करण्यासाठी काळr कपडे घालण्यासाठी आजचा दिवस निवडला. कारण त्यांना त्यांच्या तुष्टीकरणाच्या राजकारणाला आणखी प्रोत्साहन देण्यासाठी संदेश द्यायचा होता. जोपर्यंत ईडीचा संबंध आहे, कायद्याचा सर्वांनी आदर केला पाहिजे. तुष्टीकरणाचे धोरण काँग्रेस आणि देशासाठी चांगले नाही. काँग्रेसने ईडीच्या तपासात सहकार्य करावे. तक्रारीच्या आधारे प्रकरण सुरू आहे. देशातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रत्येकाने आदर केला पाहिजे, असे अमित शाह म्हणाले.
आज ही के दिन @narendramodi जी ने श्रीरामजन्मभूमि मंदिर का शिलान्यास किया था, इसलिए कांग्रेस तुष्टिकरण के लिए ये विरोध कर रही है।
— Amit Shah (@AmitShah) August 5, 2022
ED व महंगाई तो सिर्फ बहाने हैं...कांग्रेस का असली दर्द श्री राम मंदिर का बनना है।
आज तो कांग्रेस ने एक कदम और आगे बढ़ काले कपड़े पहनकर विरोध किया है। pic.twitter.com/g8cOjGjmm5
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्य नाथ यांनीही यावरून काँग्रेसवर निशाणा साधला आहे. "रामजन्मभूमीच्या उभारणीला सुरूवात झाल्यचा आजचा दिवस, भारतीय न्यायालयाच्या सन्मानाची बाब, प्रत्येक भारतीय शेकडो वर्षांपासून या दिवसाची वाट पाहत होता. 5 ऑगस्ट 2020 रोजी भव्य मंदिराचे बांधकाम सुरू झाले. या दिवशी भारताच्या श्रद्धेचा अपमान करणारे काँग्रेस नेत्यांचे आंदोलन अत्यंत निषेधार्ह आहे. मात्र, अयोध्या दिनाच्या दिवशी काळ्या कपड्यांतील काँग्रेसचे हे वर्तन पुन्हा सर्वश्रुत झाले आहे. हा भारतीय लोकशाहीचा अपमान आहे. काँग्रेसचे आचरण कोणताही भारतीय मान्य करत नाही.
आज काँग्रेस कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी महागाई, जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी वाढ आणि बेरोजगारीविरोधात काळे कपडे परिधान करून निदर्शने केली. सरकारने आपल्या नेत्यांना लक्ष्य करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा कथित गैरवापर केल्याचा आरोप करत निषेध नोंदवण्यात आला. निदर्शनादरम्यान काँग्रेस खासदार राहुल गांधी, काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सहा तासांनंतर त्यांची सुटका करण्यात आली.