एक्स्प्लोर
नरेंद्र मोदी मुर्दाबाद या घोषणा देऊ नका : राहुल गांधी
या सभेत राहुल गांधी भाषण करताना खालून कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदी मुर्दाबाद अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. त्यावेळी राहुल गांधी कार्यकर्त्यांना शांत करत म्हणाले, 'मुर्दाबाद' हा शब्द भाजप आणि आरएसएसचे लोक वापरतात, आपण नाही. आपण प्रेम आणि स्नेहावर विश्वास ठेवतो.
ओदिशा : नरेंद्र मोदी मुर्दाबाद या घोषणा देऊ नका, अशा सूचना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. ते ओदिशामधल्या राउरकेला येथे आयोजित सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर टीका केली.
या सभेत राहुल गांधी भाषण करताना खालून कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदी मुर्दाबाद अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. त्यावेळी राहुल गांधी कार्यकर्त्यांना शांत करत म्हणाले, 'मुर्दाबाद' हा शब्द भाजप आणि आरएसएसचे लोक वापरतात, आपण नाही. आपण प्रेम आणि स्नेहावर विश्वास ठेवतो.
द्वेष न दाखवता येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष भाजपला पराभूत करण्यामध्ये यशस्वी होईल, असा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला. ते म्हणाले राफेल घोटाळा समोर आला आहे तेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हावभाव बदलले आहेत. ते हताश झाले आहेत. त्यांना सगळीकडे राफेल, शेतकरी, महिला दिसतात, असं राहुल गांधी म्हणाले.
मात्र आम्ही द्वेषापोटी हे सगळ केलं नाही, आम्ही प्रेमाने त्यांना प्रश्न विचारला होता. आम्ही प्रेमाचा मार्ग अवलंबला असल्याचं राहुल गांधी म्हणाले.
निवडणुकांपूर्वी ओदिशातील कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी राहुल गांधी राउरकेलामध्ये पोहोचले होते. द्वेष पसरवून देशावर राज्य करता येणार नाही, त्यामुळे प्रेम पसरवून आपण येणाऱ्या निवडणुकीत मोदी, भाजपाचा पराभव करु, असं देखील राहुल गांधी म्हणाले. ओदिशा सरकारवर ही त्यांनी जोरदार टीका केली. ते म्हणाले, ओदिशा सरकार नरेंद्र मोदी दिल्लीत बसून चालवतात. यावेळी कार्यकर्त्यांनी 'चौकीदार ही चोर है,' अशाही घोषणा दिल्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement