(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Congress Rally : महागाईविरोधात काँग्रेसचे उद्या आंदोलन, भाजपला घेरण्यासाठी जोरदार तयारी
Congress Rally : उद्या म्हणजे 4 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता दिल्लीतील रामलीला मैदानावर काँग्रेसकडून रॅली काढण्यात येणार आहे. वाढती महागाई, बेरोजगारी आणि जीएसटीवरून भाजप सरकारला घेरण्याची तयारी काँग्रेसने केली आहे.
Congress Rally : वाढती महागाई (Inflation) , बेरोजगारी (Unemployment) आणि जीएसटीवरून (GST) भाजप (BJP) सरकारला घेरण्याची तयारी काँग्रेसने (Congress ) केली आहे. उद्या म्हणजे 4 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता दिल्लीतील रामलीला मैदानावर काँग्रेसकडून रॅली काढण्यात येणार आहे. 'महागाई पर हल्ला बोल' असे या रॅलीचे नाव असणार आहे.
काँग्रेसच्या कमिटीच्या मुख्यालयातून उद्या सकाळी नऊ वाजल्यापासून बसेस सुरू होतील. काँग्रेस नेते राहुल गांधी पक्ष मुख्यालयातून बसने दिल्लीतील रामलीला मैदावावर येऊ शकतात. त्यांत्यासोबत काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते असणरा आहेत.
LIVE: Congress party briefing by Shri @kcvenugopalmp, Shri @Jairam_Ramesh, Shri @ajaymaken and Shri @shaktisinhgohil at Ramlila Maidan, New Delhi. https://t.co/QfshFhYnFr
— Congress (@INCIndia) September 3, 2022
या रॅलीमध्ये महागाई, बेरोजगारी आणि जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लागू करण्यावरून केंद्रातील मोदी सरकारवर चौफेर हल्लाबोल करण्यात येणार आहे. या रॅलीत दिल्लीशिवाय हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील पक्षाचे कार्यकर्तेही सहभागी होणार आहेत. काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते सकाळी दहा वाजता पक्ष मुख्यालयातून बसमध्ये बसून रामलीला मैदानाकडे रवाना होतील. त्याच बसमध्ये बसून राहुल गांधीही सभेला जाऊ शकतात.
७ सप्टेंबरपासून काश्मीर ते कन्याकुमारी भारत जोडो यात्रेचे काँग्रेसकडून आयोजन करण्यात येणार आहे. त्याआधी उद्याचे आंदोलन होणार आहे. देशातील वाढत्या महागाईवरून भाजपवर सातत्याने निशाणा साधला जात आहे. महागाई आणि बेरोजगारी हे सर्वसामान्यांचे प्रश्न असून ते प्रत्येक व्यासपीठावर मांडणार असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. त्याच पार्श्वभूमीवर उद्या हे आंदोलन करण्यात येणार आहे.
काँग्रेसने 5 ऑगस्ट रोजी देखील महागाई आणि बेरोजगारीविरोधात (Unemployment) देशव्यापी आंदोलन केले होते. काँग्रेसने महागाई आणि बेरोजगारीबाबत केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे आज देखील काँग्रेसकडून महागाईविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. काँग्रेसच्या मुख्य नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली.
महत्वाच्या बातम्या