(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bihar Politics : नितीश कुमारांचं मिशन 2024, पाच सप्टेंबरला दिल्ली दौरा, विरोधकांची एकजूट करणार?
बिहारमध्ये भाजपशी काडीमोड घेत राष्ट्रीय जनता दलासोबत (RJD) घरोबा करणाऱ्या नितीश कुमारांचे लक्ष आता 2024 ला होणाऱ्या लोकसभा निवडणुकांवर असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
Nitish Kumar 2024 Mission : बिहारमध्ये (Bihar) राजकीय भूकंप घडवल्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्या हालचाली वाढल्या आहेत. बिहारमध्ये भाजपशी काडीमोड घेत राष्ट्रीय जनता दलासोबत (RJD) घरोबा करणाऱ्या नितीश कुमारांचे लक्ष आता 2024 ला होणाऱ्या लोकसभा निवडणुकांवर असल्याची चर्चा सुरु झाली आहे. मिशन 2024 च्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री नितीश कुमार दिल्लीला जाणार असल्याचीही मोठी बातमी समोर आली आहे. दिल्लीत विरोधी पक्षांच्या नेत्यांची एकजूट करण्याबाबत चर्चा होणार असल्याचे बोलले जात आहे.
पाच सप्टेंबरला नितीश कुमार दिल्लीत विरोधी पक्षांच्या नेत्यांना भेटणार
जरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून जनता दलाच्या बैठका सुरु आहेत. आज देखील दुपारी चाप वाजता राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार आहे. त्यामुळं आज होणाऱ्या बैठकीत नेमका काय निर्णय होणार याकडं देखील सर्वाचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री नितीश कुमार हे पाच सप्टेंबरला पाटणाहून दिल्लीला जाणार आहेत. नितीश कुमार हे सात सप्टेंबरपर्यंत दिल्लीतच राहणार आहेत. तिथे ते विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या भेटी घेणार आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही विरोधकांना एका व्यासपीठावर आणण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. मिशन 2024 अंतर्गत दिल्लीला जाण्याचा नितीशकुमारांचा प्लान आहे. भाजपविरोधात विरोधकांना एकत्र करण्याचा हा जेडीयूचा मास्टर प्लॅन असू शकतो, असे देखील बोलले जात आहे.
पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नितीख कुमारांच्या नावाची घोषणा होणार का?
गेल्या तीन दिवसांपासून जनता दलाची तीन दिवसीय बैठक सुरु आहे. तर आज जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार आहे. या बैठकीला सुमारे 250 नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. नितीश कुमार यांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीचा निर्णय बैठकीत होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. लालन सिंह यांनी नितीश कुमार हे पंतप्रधानपदाचे उमेदवार नसल्याचे स्पष्ट वक्तव्य केले असले तरी, विरोधकांना एका व्यासपीठावर आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
या बैठकीत विरोधकांच्या एकजुटीवर चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. बेरोजगारी, महागाई यावर केंद्र सरकारला कसे घेरायचे यावर देखील चर्चा होणार आहे. पक्षाची सदस्यत्व मोहीम, संघटनात्मक निवडणुका यावर विचारमंथन होणार आहे. अन्य राज्यांमध्ये संघटना विस्तार, गुजरात, हिमाचलसह अन्य राज्यांतील विधानसभा निवडणुका लढवणे यासह अनेक अजेंड्यावर शिक्कामोर्तब होऊ शकते. 2024 च्या लोकसभा निवडणुकीची रणनीती बनवली जाईल.
महत्त्वाच्या बातम्या: