(Source: ECI/ABP News/ABP Majha)
BJP MLA Aravind Limbavali : प्रश्न विचारताच भाजप आमदाराने महिलेवर शिव्यांचा पाऊस पाडला! याच आमदाराच्या मुलीने पोलिसांना दिल्या होत्या शिव्या
BJP MLA Aravind Limbavali : कर्नाटकातील भाजप आमदाराने एका महिलेसोबत गैरवर्तन केल्याची घटना समोर आली आहे. भाजप आमदार अरविंद लिंबावली यांनी महिलेला शिवीगाळ केली आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.
BJP MLA Aravind Limbavali : कर्नाटकातील भाजप आमदाराने एका महिलेसोबत गैरवर्तन केल्याची घटना समोर आली आहे. भाजप आमदार अरविंद लिंबावली यांनी महिलेला शिवीगाळ केली आहे. तक्रार अर्ज देण्यासाठी महिला आमदारापर्यंत पोहोचली असता हा प्रकार घडला. या पत्रात बंगळूरमध्ये पावसानंतर वरथूरला भेडसावणाऱ्या समस्या मांडण्यात आल्या होत्या.
#WATCH |Karnataka BJP MLA Aravind Limbavali verbally abused a woman&misbehaved when she tried to hand over a complaint letter to him&speak to him regarding issues in Varthur, Bengaluru following heavy rainfall
— ANI (@ANI) September 3, 2022
She was later taken to Police Station (02.9)
(Note:Abusive language) pic.twitter.com/9QL51UDL5d
या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. ती महिला आमदाराशी बोलण्याचा प्रयत्न करत आहे, पण तिला बोलू दिले जात नसल्याचे दिसून येते. महिलेने तक्रारीचे पत्र आमदाराला दाखवले असता त्यांनी रागाच्या भरात ते हिसकावले. पोलिसांसह इतर लोकही घटनास्थळी उपस्थित आहेत. आमदार महिलेशी मोठ्या आवाजात शिवीगाळ करताना दिसत आहेत.
काही दिवसांपूर्वीच आमदाराच्या मुलीकडूनही पोलिसांशी गैरवर्तन
काही दिवसांपूर्वी आमदार अरविंद लिंबावली यांच्या मुलीने पोलिसांशी गैरवर्तन केले होते. ओव्हरस्पीड आणि रॅश ड्रायव्हिंगमध्ये कार चालवल्याबद्दल पोलिसांनी त्यांच्या मुलीला थांबवले होते. बीएमडब्ल्यू कारमधील आमदाराच्या मुलीने पोलिस खात्याच्या कारला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला होता. विधानसभेजवळील कॅपिटल हॉटेलजवळ भाजपची बैठक सुरू असताना ही घटना घडली होती.
ओव्हरस्पीड केल्याने तिची गाडी पोलिसांनी अडवली होती. यावरून आमदार मुलगी आणि पोलिसांमध्ये वादावादी झाली. आमदाराच्या मुलीने सांगितले की, तिने कोणत्याही नियमाचे उल्लंघन केले नाही आणि जाऊ दिलं पाहिजे, तर पोलिस तिचा वेग जास्त असल्याचे ठाम होते. या वादात तिने मी आमदाराची मुलगी असल्याचे सांगितले. त्यामुळे या प्रकरणात आपल्यावर खटला चालवता येणार नाही, असेही सांगून मोकळी झाली होती.
इतर महत्वाच्या बातम्या