एक्स्प्लोर

पंढरपूरमध्ये गॅस टंचाईचं संकट गडद! दोन दिवसात बहुतांश हॉटेल पडणार बंद, भाविकांचे हाल होण्याची शक्यता

इराण-अमेरिका-इस्रायल संघर्षाच्या झळा जगभरातील अनेक देशांना लागल्या आहेत. या युद्धाच्या परिस्थितीचा परिणाम आता भारतासह महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातही जाणवू लागला आहे.

Solapur Pandharpur LPG Gas News :  इराण-अमेरिका-इस्रायल संघर्षाच्या झळा जगभरातील अनेक देशांना लागल्या आहेत. या युद्धाच्या परिस्थितीचा परिणाम आता भारतासह महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातही जाणवू लागला आहे. अनेक ठिकाणी घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरसाठी नागरिकांना लांबच लांब रांगा लावाव्या लागत असल्याचं चित्र समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना गॅस जपून वापरण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरमध्ये देखील गॅस टंचाईचं संकट गडद झालं आहे. येत्या दोन दिवसात पंढरपुरातील बहुतांश हॉटेल पडणार बंद पडण्याची शक्यता आहे. यामुळं भाविकांचे हाल होणार आहेत.  

 बहुतांश हॉटेलकडे आता एक किंवा दोन दिवसाचा गॅस शिल्लक 

सध्या सुरु असलेल्या गॅस टंचाईचा फटका आता पंढरपूरला येणाऱ्या भाविकांनाही बसण्यास सुरुवात झाली आहे. येत्या दोन दिवसात शहरातील बहुतांश हॉटेल बंद पडतील अशी अवस्था झाली आहे. त्यामुळं विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भाविकांना आता सोबत येताना टिफिन घेऊन येण्याची वेळ येणार आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे सध्या शहरातील शेकडो हॉटेल ना मिळणारा व्यावसायिक गॅसचा पुरवठा जवळपास बंद झाला आहे. बहुतांश हॉटेलकडे आता एक किंवा दोन दिवसाचा गॅस शिल्लक असून नवीन गॅस मिळत नसल्याने हॉटेल बंद होण्यास सुरुवात झाली आहे. 

रोज शहरात एक लाखापेक्षा जास्त भाविक पर्यटक येतात

सध्या रोज शहरात एक लाखापेक्षा जास्त भाविक पर्यटक येत असतात. यातच शनिवार रविवारी ही संख्या अडीच ते तीन लाखापर्यंत जात असते. आता गॅसचा पुरवठाच जवळपास बंद झाल्याने येणाऱ्या भाविकांना सकाळच्या चहापासून रात्रीच्या जेवणापर्यंत अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. किमान तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी तरी हॉटेल चालकांना थोड्या प्रमाणात  व्यावसायिक गॅस चा पुरवठा सुरू केल्यास देशभरातून येणाऱ्या लाखो पर्यटक आणि भाविकांना त्रास होणार नाही अशी अपेक्षा हॉटेल चालक संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग बापट यांनी बोलून दाखवली आहे. 

Temple Langar Impact: मंदिरं आणि गुरुद्वारांतील अन्नछत्रावर परिणाम

एलपीजी गॅस टंचाईचा परिणाम पुण्यातील मंदिरं आणि गुरुद्वारांमधील अन्नछत्रावरही दिसू लागलाय. या ठिकाणी दररोज हजारो गरजू लोकांना जेवण दिलं जातं. मात्र गॅस सिलेंडर वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळं स्वयंपाकावर परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी भंडारा किंवा लंगरमध्ये सध्या फक्त दाल आणि भात दिला जातोय, तर चपात्या देणं तात्पुरतं बंद करण्यात आल्याचंही समोर आलं आहे.

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: बारामतीत पोटनिवडणुकीसाठी मतदान; मात्र, शरद पवार मतदानाचा हक्क बजावू शकणार नाहीत
Maharashtra Live blog updates: बारामतीत पोटनिवडणुकीसाठी मतदान; मात्र, शरद पवार मतदानाचा हक्क बजावू शकणार नाहीत
Ulhasnagar politics: उल्हासनगर महापालिकेत शिवसेना अन् भाजपमध्ये घमासान; विरोधी पक्षनेते नियुक्तीवरून गदारोळ, महापौरांच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान?
उल्हासनगर महापालिकेत शिवसेना अन् भाजपमध्ये घमासान; विरोधी पक्षनेते नियुक्तीवरून गदारोळ, महापौरांच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान?
Ahilyanagar News: भाजपच्या दोन नेत्यांमधील वाद विकोपाला; पुन्हा एकदा 'श्रीगणेश' विरूद्ध विखे कारखान्यात 'सर्वोच्च' न्यायालयात लढाई; नेमकं प्रकरण काय?
भाजपच्या दोन नेत्यांमधील वाद विकोपाला, विखे विरूद्ध कोल्हे कारखान्याचा संघर्ष सर्वोच्च न्यायालयात; नेमकं प्रकरण काय?
आमचं कुटुंब देशसेवेसाठी सदैव तत्पर, खासदार व्हायला नक्की आवडेल, आमदार श्रीजया चव्हाण यांचं वक्तव्य, तर अशोक चव्हाण म्हणाले... 
आमचं कुटुंब देशसेवेसाठी सदैव तत्पर, खासदार व्हायला नक्की आवडेल, आमदार श्रीजया चव्हाण यांचं वक्तव्य, तर अशोक चव्हाण म्हणाले... 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mumbai Worli Traffic : मुंबईत ट्रॅफिकला ब्रेक, महिलेचा उद्रेक Special Report
Beed Walmik Karad News Audio Clip : वाल्मिक कराड गँगची तुरुंगात पुन्हा दहशत?
Amol Mitkari On Murlidhar Mohol :ब्लॅक बॉक्स कुठे? विमानाचा CCTV कुठे? मोहोळांनी माफी मागावी-मिटकरी
Nashik TCS Case : निर्लज्जपणाचा कहर नराधमांच्या हाती पदर Special Report
Sanjay Dutt Movie : काँग्रेसच्या भुमिकेमुळे संजय दत्तच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime news: मोठी बातमी: महिला क्रिकेटरने मुंबईतील उद्योगपतीला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवलं, 63 लाख उकळले, पोलिसांकडून अटकेची कारवाई
मोठी बातमी: महिला क्रिकेटरने मुंबईतील उद्योगपतीला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवलं, 63 लाख उकळले, पोलिसांकडून अटकेची कारवाई
Maharashtra Live blog updates: बारामतीत पोटनिवडणुकीसाठी मतदान; मात्र, शरद पवार मतदानाचा हक्क बजावू शकणार नाहीत
Maharashtra Live blog updates: बारामतीत पोटनिवडणुकीसाठी मतदान; मात्र, शरद पवार मतदानाचा हक्क बजावू शकणार नाहीत
Ulhasnagar Clash : उल्हासनगरमध्ये शिवसेना-भाजपमध्ये संघर्ष, केवळ एक नगरसेवक असलेल्या काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद दिल्याने गोंधळ
उल्हासनगरमध्ये शिवसेना-भाजपमध्ये संघर्ष, केवळ एक नगरसेवक असलेल्या काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद दिल्याने गोंधळ
Sukanya Samriddhi Yojana: सुकन्या समृद्धी योजनेतून 21 वर्ष पूर्ण होण्याअगोदर पैसे काढता येतात का?  जाणून घ्या कधी पैसे काढता येतात? प्रक्रिया काय असते? 
सुकन्या समृद्धी योजनेतून 21 वर्ष पूर्ण होण्याअगोदर पैसे काढता येतात का? प्रक्रिया काय असते? 
Sukesh Chandrashekhar : प्रेमात आणि युद्धात सर्वकाही माफ, तुझ्यावर वेड्यासारखं प्रेम करतोय; माफीची साक्षीदार होण्याऱ्या जॅकलिनला सुकेशचे तुरुंगातून पत्र
प्रेमात आणि युद्धात सर्वकाही माफ, तुझ्यावर वेड्यासारखं प्रेम करतोय; माफीची साक्षीदार होण्याऱ्या जॅकलिनला सुकेशचे तुरुंगातून पत्र
विवस्त्र व्हिडीओ कॉल करते, 20 हजार दे; प्रसिद्ध अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे 'नको ते चॅट्स' व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
विवस्त्र व्हिडीओ कॉल करते, 20 हजार दे; प्रसिद्ध अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे 'नको ते चॅट्स' व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Baramati Byelection 2026 Sunetra Pawar: अजित पवार नाहीत, शरद पवारही आजारी; सुनेत्रा पवारांचा कंठ बोलताना दाटून आला, म्हणाल्या...
अजित पवार नाहीत, शरद पवारही आजारी; सुनेत्रा पवारांचा कंठ बोलताना दाटून आला, म्हणाल्या...
Madha Clash : ओळखपत्र मागितल्याने उत्पादन शुल्क अधिकारी चिडले, धाबेवाल्याला मारहाण; नंतर ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना चांगलंच चोपलं
ओळखपत्र मागितल्याने उत्पादन शुल्क अधिकारी चिडले, धाबेवाल्याला मारहाण; नंतर ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना चांगलंच चोपलं
Embed widget