एक्स्प्लोर

Period Leave : ... तर महिलांना कुणी नोकरी देणार नाही; पीरियड लीव्ह याचिकेवर सुनावणी करण्यास न्यायालयाचा नकार

Menstrual Leave : खासगी कंपन्या त्यांच्या अधिकारात अशी सुट्टी देत असतील तर ते स्वागतार्ह आहे, पण ती कायदेशीर बंधनकारक केल्यास मात्र काही अडचणी निर्माण होऊ शकतात असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं. 

नवी दिल्ली : महिला कर्मचारी आणि विद्यार्थिनींसाठी मासिक पाळीच्या काळात सशुल्क सुट्टी (Period Leave) देण्याची देशव्यापी धोरण तयार करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी करण्यास नकार दिला आहे. शुक्रवार (13मार्च) रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयानं असं स्पष्ट केले की, अशी सुट्टी कायद्यानं अनिवार्य केल्यास कंपन्या महिलांना नोकरी देण्यास टाळाटाळ करू शकतात.

महिलांसाठी ‘मेनस्ट्रुअल लीव्ह’ (Menstrual Leave) देण्याबाबत धोरण तयार करण्याची मागणी सुप्रीम कोर्टात करण्यात आली होती. मात्र न्यायालयाने या विषयावर थेट हस्तक्षेप करण्यास नकार देत संबंधित विभागांनी सर्व भागधारकांशी चर्चा करून धोरणाचा विचार करावा, असे मत व्यक्त केले.

Menstrual Leave Petition : भीती निर्माण करण्यासाठी याचिका दाखल?

सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या खंडपीठाने निरीक्षण नोंदवलं की, अशा प्रकारच्या काही याचिका समाजात भीती निर्माण करतात. यामुळे महिलांना कमी लेखलं जातं आणि मासिक पाळी ही महिलांसाठी काहीतरी नकारात्मक किंवा त्रासदायक बाब असल्याचा संदेश दिला जातो.

Women Employment Impact : समाजावर होऊ शकतात नकारात्मक परिणाम

सुप्रीम कोर्टाने असेही नमूद केलं की, पीरियड्स लीव्ह हा सकारात्मक अधिकार असू शकतो, मात्र कंपन्यांच्या दृष्टीने सशुल्क सुट्टी देण्याची जबाबदारी विचारात घेतली पाहिजे. अशा प्रकारची सक्ती केली तर त्याचे समाजावर आणि रोजगाराच्या संधींवर नकारात्मक परिणाम होऊ शकतात.

Kerala Period Leave Example : काही राज्यांमध्ये आधीच सुविधा

याचिकाकर्त्यांचे वकील वरिष्ठ अधिवक्ता एम. आर. शमशाद यांनी सुनावणीदरम्यान सांगितले की, केरळसारख्या काही राज्यांमध्ये विद्यार्थिनींसाठी मासिक पाळीच्या सुट्टीसंदर्भात सवलती देण्यात आल्या आहेत. तसेच काही खासगी कंपन्यांनीही स्वेच्छेने महिलांना अशी सुट्टी देण्याची सुविधा सुरू केली आहे.

यावर प्रतिक्रिया देताना सरन्यायाधीशांनी सांगितलं की, कंपन्यांनी स्वेच्छेने अशी सुविधा देणे स्वागतार्ह आहे. मात्र ती कायद्याने अनिवार्य केली तर नियोक्ते महिलांना नोकरी देण्यास टाळतील आणि त्यामुळे त्यांच्या करिअरवरही परिणाम होऊ शकतो.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जुलै 2026 | सोमवार
सर्वोच्च न्यायालयाने गोहत्या बंदी आदेशाला स्थगिती दिली; हायकोर्टाच्या आदेशात सुधारणा करणे आवश्यक असल्याचे सुतोवाच
सर्वोच्च न्यायालयाने गोहत्या बंदी आदेशाला स्थगिती दिली; हायकोर्टाच्या आदेशात सुधारणा करणे आवश्यक असल्याचे सुतोवाच
गुजरातमध्ये चांदीपुरा व्हायरसचा प्रसार, एका महिन्यात 12 मुलांचा मृत्यू, 3 जणांना संसर्ग; अद्याप लस सुद्धा नाही!
गुजरातमध्ये चांदीपुरा व्हायरसचा प्रसार, एका महिन्यात 12 मुलांचा मृत्यू, 3 जणांना संसर्ग; अद्याप लस सुद्धा नाही!
Uddhav Thackeray and Sonam Wangchuk: प्राणांतिक उपोषण सोडण्याची विनंती, सोनम वांगचूक उद्धव ठाकरेंना म्हणाले, 'माझं काहीही झालं तरी चालेल, पण देशाचं भलं झालं पाहिजे'
प्राणांतिक उपोषण सोडण्याची विनंती, सोनम वांगचूक उद्धव ठाकरेंना म्हणाले, 'माझं काहीही झालं तरी चालेल, पण देशाचं भलं झालं पाहिजे'

व्हिडीओ

Ramdev Baba : राम देवबाबांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेस, मुस्लिम धर्मगुरू आक्रमक | Special Report
CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणींची 92 लाख नावं वगळली, सरकार आता जागले | ABP Majha Special Report
Kolhapur Crime : घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापूर हादरलं
Vinayak Raut PC : १२ कोटींची मागणी; माझ्या बदनामीचे मोठे राजकीय षडयंत्र, विनायक राऊतांचे आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : होर्मुझमधून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, इराणकडून अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले सुरुच
होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, ट्रम्प यांची घोषणा  
Mutual Fund : 2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या
2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या
Team India : टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
INDW vs ENGW: भारताच्या लेकींनी लॉर्डसवर इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, क्रांती गौड, यास्तिका भाटियाची दमदार कामगिरी
भारताच्या लेकींनी इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, लॉर्डसवरील पहिल्याच कसोटीत विजयाचा झेंडा रोवला
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
Embed widget