एक्स्प्लोर

सभेचा 'पवार पॅटर्न' आता देशातही, धो-धो पावसात राहुल गांधींचं भाषण, व्हिडीओ व्हायरल

Bharat Jodo Yatra : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मुसळधार बरसणारा पाऊस अंगावर झेलत कर्नाटकाच्या म्हैसुरमध्ये भाषण केलं. त्यांच्या या सभेचा व्हिडीओ देखील त्यांनी ट्विट केला आहे.

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) सध्या  कर्नाटकात पोहोचली आहे. रविवारी राहुल गांधी यांनी कर्नाटकातील नंजनगुड येथील प्रसिद्ध प्राचीन श्रीकांतेश्वर स्वामी मंदिराला भेट दिली. यानंतर सायंकाळी त्यांनी म्हैसूर येथील एपीएमसी मैदानावर सभेला संबोधित केले. यादरम्यान मध्येच जोरदार पाऊस सुरू झाला. मात्र, राहुल गांधी यांनी आपले भाषण सुरूच ठेवले. यावेळी त्यांनी भाजप आणि आरएसएसवर जोरदार निशाणा साधला. भाषणानंतर  त्यांनी भर पावसातच कार्यकर्त्यांची देखील भेट घेतली. राहुल गांधींच्या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.   

व्हिडीओमध्ये राहुल गांधी पावसात रॅलीला संबोधित करताना दिसत आहेत. राहुल  गांधी यांनी भर पावसात देखील आपलं भाषण सुरूच ठेवलं. यावेळी भाषण एकण्यासाठी उपस्थित कार्यकर्ते देखील त्यांच भाषण ऐकत थांबले. अशा पावसात देखील कार्यकर्त्यांनी मैदान सोडलं नाही. यावेळी राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. नदीसारखी ही यात्रा कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत होईल. या नदीत तुम्हाला हिंसा, द्वेष दिसणार नाही. फक्त प्रेम आणि बंधुभाव दिसतील. हा प्रवास थांबणार नाही. आता बघा, पाऊस येतोय, पावसाने देखील यात्रा थांबवली नाही. उन, वादळ देखील ही यात्रा थांबवू शकणार नाहीत.  देशात द्वेष पसरवणाऱ्या भाजप आणि आरएसएसच्या विरोधात उभे राहणे हा या यात्रेचा उद्देश आहे, असे राहुल गांधी म्हणाले.  

राहुल गांधी यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर देखील हा व्हिडीओ शेअर केला आहे. यासोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "आम्हाला भारताला एकत्र करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. भारताचा आवाज उठवण्यापासून आम्हाला कोणीही रोखू शकत नाही. कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत भारत जोडो यात्रेला कोणीही रोखू शकत नाही.

दरम्यान, या सभेपूर्वी राहुल गांधी यांनी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली. कर्नाटकातील खादी ग्रामोद्योग केंद्राला त्यांनी भेट दिली. 1927 आणि 1932 मध्ये महात्मा गांधींनीही येथे भेट दिली होती. स्वातंत्र्यसैनिकाची हत्या करणाऱ्या विचारसरणीने गेल्या आठ वर्षांत विषमता आणि विभाजनाला जन्म दिला अशी टीका यावेळी राहुल गांधी यांनी भाजपवर केली.  

राहुल गांधी यांची सध्या भारत जोडो यात्रा सुरू आहे. 30 सप्टेंबर रोजी ते  तामिळनाडू राज्यातील गुडालूर येथून कर्नाटकातील गुंडलुपेट येथे पोहोचले. पुढील वर्षी राज्यात निवडणुका होणार असल्याने कर्नाटकसह काँग्रेसची यात्रा निर्णायक टप्प्यात पोहोचली आहे. ही यात्रा पहिल्यांदाच भाजपशासित राज्यातून जात आहे.

कर्नाटकात  पोस्टर्स  फाडले 

यात्रेच्या कर्नाटक प्रवेशापूर्वी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधींच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी पोस्टर लावले होते. मात्र चामराजनगर जिल्ह्यातील गुंडलुपेट भागात अनेक पोस्टर्स फाडण्यात आले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Embed widget