एक्स्प्लोर
राणेंनी ज्यांना ‘दुर्योधन’ म्हटलं, त्या मोहन प्रकाश यांचं राणेंना उत्तर
राणे काँग्रेसला रिकामं करण्याची भाषा करतायत, त्यावर विचारलं असता राणे आणि त्यांच्या पुत्रांचे राजकीय व्यवहार काय प्रकारचे आहेत याची चांगली कल्पना महाराष्ट्रातल्या जनतेला असल्याचं मोहन प्रकाश म्हणाले.
नवी दिल्ली : काँग्रेस सोडताना नारायण राणे यांनी ज्यांचा उल्लेख ‘दुर्योधन’ म्हणून केला, त्या काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश यांनी एबीपी माझाच्या मुलाखतीत राणेंच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. एका कुटुंबात तीन तीन तिकिटं, दोनदा निवडणूक हारल्यावरही पुन्हा सन्मानानं आमदारकी असं आजवर कुठल्या पक्षाच्या इतिहासात झालंय का? असा तिखट टोला मोहन प्रकाश यांनी लगावला.
नारायण राणेंचा काँग्रेसनं नेहमीच सन्मान केलाय. मला ते दुर्योधन का म्हटले ठाऊक नाही, पण ते काँग्रेसमध्ये आले तेव्हा मी पक्षाचा सचिव नव्हतो. अशोक चव्हाण मुख्यमंत्री झाले तेव्हाही मी सचिव नव्हतो. शिवाय मुख्यमंत्री कुणाला करायचं याचा अधिकार एखाद्या सचिवाच्या नसतो हे राणेंनी लक्षात घ्यायला हवं असंही ते म्हणाले.
राणे काँग्रेसला रिकामं करण्याची भाषा करतायत, त्यावर विचारलं असता राणे आणि त्यांच्या पुत्रांचे राजकीय व्यवहार काय प्रकारचे आहेत याची चांगली कल्पना महाराष्ट्रातल्या जनतेला असल्याचं वक्तव्य केलं.
राणेंच्या पत्रकार परिषदेला त्यांचे पुत्र आणि काँग्रेस आमदार नितीश राणे हे उपस्थित नव्हते, ते अजूनही काँग्रेसमध्येच आहेत का या प्रश्नावर जो कुणी पक्षात आहे, त्याचा आम्ही सन्मानच करु, त्यांचे नाते कुणाशी कसेही असले तरी.
मोहन प्रकाश हे गेल्या दहा वर्षांपासून काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी आहेत. काँग्रेसच्या परंपरागत दरबारी राजकारणाच्या शैलीतच ते काम करतात. आजच्या पत्रकार परिषदेत अशोक चव्हाण यांच्यासह राणेंचा सर्वाधिक निशाणा मोहन प्रकाश यांच्यावरच होता. मला कुणी चक्रव्यूहात फसवू शकत नाही, आणि फसवायचे प्रयत्न केलाच तर ते करणारे दुर्योधन अशोक चव्हाण, मोहन प्रकाश यांच्याशिवाय दुसरं कुणी नसेल असं वक्तव्य राणेंनी केलं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement