एक्स्प्लोर

Congress Jairam Ramesh : 2029 ची निवडणूक काँग्रेसने स्वबळावर लढवावी; असे का म्हटले जयराम रमेश?

Congress Jairam Ramesh : भाजपविरोधात तयार होणाऱ्या विरोधकांची आघाडी ही काँग्रेसशिवाय पूर्ण होऊ शकत नसून काँग्रेस मुख्य आधार असल्याचे वक्तव्य काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केले.

Congress :  आगामी 2024 मधील लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election 2024) भाजपचा सामना करण्यासाठी विरोधकांच्या कोणत्याही आघाडीला काँग्रेसचा (Congress) आधार लागणार असल्याचे काँग्रेस नेते जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी सांगितले. काँग्रेसने 2029 मधील निवडणूक प्रत्येक राज्यात स्वबळावर लढवण्याचीदेखील तयारी करायला हवी, असे मतही जयराम रमेश यांनी व्यक्त केले. 

काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या जम्मू-काश्मीरमध्ये आहे. यावेळी अवंतीपुरामध्ये पीटीआय या वृत्तसंस्थेसोबत संवाद साधताना त्यांनी आपली मते व्यक्त केली. माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी म्हटले की, सध्याची भारत जोडो यात्रा संपल्यानंतर गुजरातमधील पोरबंदर ते अरुणाचल प्रदेशमधील परशुरामपूर कुंड या दरम्यान आणखी एक यात्रा काढण्यात यावी. मात्र, याबाबत पक्षाला याचा निर्णय घ्यायचा आहे, असेही रमेश यांनी म्हटले. उदयपूर येथे पार पडलेल्या चिंतन शिबिरात भारत जोडो यात्रेबाबत चर्चा झाली तेव्हा पश्चिम ते पूर्वे भारत अशीदेखील यात्रा काढण्यात यावी, याबाबत विचार झाला होता, असेही त्यांनी म्हटले. 

भारत जोडो यात्रेनंतर काँग्रेस हा विरोधकांचा आधार  असेल का, याबाबत विचारले असता त्यांनी भाजपशिवाय, काँग्रेसच खऱ्या अर्थाने राष्ट्रीय पक्ष आहे. अनेक राज्यात आमची सत्ता नाही. मात्र, प्रत्येक गाव, ब्लॉक, वस्ती, शहरात तुम्हाला काँग्रेस कार्यकर्ता, काँग्रेस परिवार आढळून येईल. रमेश यांनी दावा करताना म्हटले की, भाजपा भले सत्तेत असेल. मात्र, काँग्रेसच देशव्यापी पक्ष आहे. काँग्रेसच्या सहभागाने तयार झालेली आघाडीच भाजपाचा मुकाबला करू शकते, असेही त्यांनी म्हटले. काँग्रेसने स्वबळावर भाजपाचा स्वबळावर 2024 मध्ये मुकाबला करावा, अशी स्थिती सध्या नसल्याचे त्यांनी मान्य केले. 

रमेश यांनी पुढे म्हटले की, 2029 मध्ये प्रत्येक राज्यात आम्ही स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी करायला हवी. माझ्या या भूमिकेबाबत पक्षातंर्गतही पाठिंबा मिळणार नाही, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. काही राज्यांमध्ये काँग्रेसने आपल्या आघाडीतील काही पक्षांना अधिक मोकळीक, वाव दिला आहे आणि हीच बाब पक्ष संघटनेसाठी हानीकारक  असल्याचे त्यांनी म्हटले. राहुल गांधी यांचा जोर नेहमीच संघटना बळकटीवर राहिला आहे. पक्ष संघटना बळकट झाल्याशिवाय पक्ष सत्तेत येऊ शकत नाही, असे राहुल गांधी यांचे मत असल्याचेही रमेश यांनी म्हटले.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आंदोलनाच्या सुरुवातीपासून आम्ही जरांगे पाटलांसोबत; आमदार धीरज देशमुखांनी घेतली भेट
आंदोलनाच्या सुरुवातीपासून आम्ही जरांगे पाटलांसोबत; आमदार धीरज देशमुखांनी घेतली भेट
अमेरिका नाही, तर सिंगापूरच्या राष्ट्राध्यक्षांना सर्वाधिक पगार; भारतीय चलनानुसार किती?
अमेरिका नाही, तर सिंगापूरच्या राष्ट्राध्यक्षांना सर्वाधिक पगार; भारतीय चलनानुसार किती?
PM Internship : पीएम इंटर्नशीपसाठी 'या' दिवसापासून भरता येणार फॉर्म, तरुणांना दरमहा मिळणार 5 हजार रुपये; कसा कराल अर्ज?
पीएम इंटर्नशीपसाठी 'या' दिवसापासून भरता येणार फॉर्म, तरुणांना दरमहा मिळणार 5 हजार रुपये; कसा कराल अर्ज?
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, चकमक सुरूच; बॉर्डरवर 600 जवान तैनात
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, चकमक सुरूच; बॉर्डरवर 600 जवान तैनात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aadivashi MLA Protest Special Report : आदिवासी आमदारांच्या मागण्या काय ?Top 25 : टॉप 25 न्यूज : 10 PM :4 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaHarshvardhan Patil Special Report : जुना हिशेब, साथीला साहेब; हर्षवर्धन पाटलांच्या हाती तुतारीPune Crime Special Report : सोकोवले गुन्हेगार; पुण्यात पुन्हा अत्याचार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आंदोलनाच्या सुरुवातीपासून आम्ही जरांगे पाटलांसोबत; आमदार धीरज देशमुखांनी घेतली भेट
आंदोलनाच्या सुरुवातीपासून आम्ही जरांगे पाटलांसोबत; आमदार धीरज देशमुखांनी घेतली भेट
अमेरिका नाही, तर सिंगापूरच्या राष्ट्राध्यक्षांना सर्वाधिक पगार; भारतीय चलनानुसार किती?
अमेरिका नाही, तर सिंगापूरच्या राष्ट्राध्यक्षांना सर्वाधिक पगार; भारतीय चलनानुसार किती?
PM Internship : पीएम इंटर्नशीपसाठी 'या' दिवसापासून भरता येणार फॉर्म, तरुणांना दरमहा मिळणार 5 हजार रुपये; कसा कराल अर्ज?
पीएम इंटर्नशीपसाठी 'या' दिवसापासून भरता येणार फॉर्म, तरुणांना दरमहा मिळणार 5 हजार रुपये; कसा कराल अर्ज?
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, चकमक सुरूच; बॉर्डरवर 600 जवान तैनात
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, चकमक सुरूच; बॉर्डरवर 600 जवान तैनात
Dilip Khedkar : बोगस IAS अधिकारी पूजा खेडकरच्या वडिलांचे राधाकृष्ण विखे पाटलांवर गंभीर आरोप! लेकीच्या विरोधातील कारवाईवरही बोलले
बोगस IAS अधिकारी पूजा खेडकरच्या वडिलांचे राधाकृष्ण विखे पाटलांवर गंभीर आरोप! लेकीच्या विरोधातील कारवाईवरही बोलले
S Jaishankar Pakistan Visit : तब्बल 9 वर्षांनी पहिल्यांदाच मोदी सरकारमधील मंत्री दोन दिवस पाकिस्तान दौऱ्यावर जाणार!
तब्बल 9 वर्षांनी पहिल्यांदाच मोदी सरकारमधील मंत्री दोन दिवस पाकिस्तान दौऱ्यावर जाणार!
तारीख अन् वेळ ठरली, जयंत पाटलांनीच सांगितला; हर्षवर्धन पाटलांसाठी शरद पवारांची इंदापुरात जंगी सभा
तारीख अन् वेळ ठरली, जयंत पाटलांनीच सांगितला; हर्षवर्धन पाटलांसाठी शरद पवारांची इंदापुरात जंगी सभा
तुमच्या सरदाराने सत्तेच्या जाळ्यात उड्या मारल्या होत्या ना?; झिरवळांच्या उडीवर भडकले राज ठाकरे
तुमच्या सरदाराने सत्तेच्या जाळ्यात उड्या मारल्या होत्या ना?; झिरवळांच्या उडीवर भडकले राज ठाकरे
Embed widget