एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राहुल गांधींवर स्नाईपर हल्ल्याची भीती, चेहऱ्यावर 'हिरवा लेझर लाईट' दिसल्याने काँग्रेसला संशय
अमेठीमधील रोड शोनंतर राहुल गांधी पत्रकारांशी बोलत असताना त्यांच्या चेहऱ्यावर हिरव्या रंगाचा लेझर लाईट पडलेला व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्याबद्दल काँग्रेस नेते अहमद पटेल, रणदीप सुरजेवाला यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला पत्र लिहून भीती व्यक्त केली आहे.
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सुरक्षेविषयी चिंता व्यक्त करणारं पत्र काँग्रेसने गृह मंत्रालयाला लिहिलं आहे. अमेठीमध्ये झालेल्या राहुल गांधींच्या रोड शोमध्ये त्यांच्या चेहऱ्यावर हिरवा लेझर लाईट आढळल्याने काँग्रेसने स्नाईपर हल्ल्याची भीती व्यक्त केली आहे.
अमेठीमधील रोड शोनंतर राहुल गांधी पत्रकारांशी बोलत असताना त्यांच्या चेहऱ्यावर हिरव्या रंगाचा लेझर लाईट पडलेला व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्याबद्दल काँग्रेस नेते अहमद पटेल, रणदीप सुरजेवाला यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला पत्र लिहून भीती व्यक्त केली आहे. तसंच या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही पत्रात करण्यात आली आहे.
VIDEO | अमेठीतील रॅलीदरम्यान राहुल गांधींच्या चेहऱ्यावर लेजर लाईट? | अमेठी | एबीपी माझा
'भारताचे दोन माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्यासोबत घातपात झाला होता. 1991 साली लोकसभा निवडणुकांच्या काळातच राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली होती.' असा उल्लेखही पत्रात आहे.
राहुल गांधी यांच्या चेहऱ्यावर किमान सातवेळा ग्रीन लेझर लाईट मारण्यात आल्याचं पत्रात म्हटलं आहे. पुरावा म्हणून काँग्रेसने संबंधित व्हिडिओही सोबत जोडला आहे.
दरम्यान, लेझरऐवजी उन्हामुळे माईक-कॅमेराचं परावर्तन झाल्याचीही शंका व्यक्त केली जात आहे. काँग्रेसच्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे, हे लवकरच समोर येईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रीडा
निवडणूक
राजकारण
Advertisement