एक्स्प्लोर

Bharat Jodo Nyay Yatra : मेघालयात सुरु होणार भारत जोडो न्याय यात्रेचा पुढचा टप्पा, राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

Rahul Gandhi : राहुल गांधी यांची भारत जोडो ही यात्रा मेघालयामध्ये पोहचली असून पुन्हा ही यात्रा आसाममध्ये जाणार आहे. तसेच आसाम मेघालय राज्यांच्या सीमेवर राहुल गांधी तरुणांशी देखील संवाद साधणार आहे.

मुंबई : काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा (Bharat Jodo Nyay Yatra) सोमवारी 22 जानेवारी रोजी मेघालयात (Meghalaya) पोहोचली. खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा आसामच्या मोरीगाव जिल्ह्यातून मेघालयात दाखल झाली. राज्याच्या सीमेवर प्रवेश केल्यानंतर लगेचच खासदार राहुल गांधी आणि पक्षाच्या अनेक नेत्यांनी री भोई जिल्ह्यातील नोंगपोह येथे पदयात्रेत भाग घेतला.

री भोई जिल्ह्यातील बर्निहाट येथे राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा टप्पा असणार आहे. तसेच इथे नॉन्गपोहमध्ये प्रदेश काँग्रेस कमिटीने आयोजित केलेल्या एका बैठकीला देखील राहुल गांधी हे हजर राहणार असल्याची माहिती देण्यात आलीये. दरम्यान मेघालयमधून ही यात्रा पुन्हा एकदा आसाममध्ये जाणार आहे. तसेच मंगळावर 23 जानेवारी रोजी सकाळी आसाम -मेघालयच्या सीमेवर तरुणांशी राहुल गांधी हे चर्चा करणार आहेत. 

केंद्र सरकारवर हल्लाबोल

मेघालयातील जनतेशी संवाद साधताना राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी म्हटलं की, खुद्द गृहमंत्री अमित शहा यांनी मेघालय सरकार हे देशातील सर्वात भ्रष्ट सरकार असल्याचे म्हटले होते. मेघालय सरकारला सर्वात भ्रष्ट म्हटल्यावर लगेचच त्यांनी इथल्या सरकारसोबत युती देखील केली. तुमच्या भाषा आठव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट नाहीत. तुमची जमीन, आदिवासी, स्थानिक लोक आणि जंगले यांचे संरक्षण करणाऱ्या वास्तू उखडून टाकल्या आहेत.

मी दिल्लीतील तुमचा पाईक - राहुल गांधी

मी दिल्लीत तुमचा शिपाई आहे. तुम्हाला माझ्याकडून जे काही लागेल, ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी नेहमीच प्रयत्न करेन. आम्ही कधीही तुमच्या इतिहास, परंपरा, भाषा, धर्म किंवा जीवनशैली कोणालाही इजा होऊ देणार नाही. भाजप आणि आरएसएस आपल्या देशाच्या पायावर आघात करत होते. भारताच्या कल्पनेचे रक्षण करण्यासाठी आम्ही समुद्रातून काश्मीरच्या पर्वतापर्यंत चालत गेलो. आम्ही शेतकरी, मजूर आणि तरुणांचा आवाज ऐकला, असं म्हणत राहुल गांधी यांनी भाजपवर निशाणा साधला. दरम्यान राहुल गांधींची न्याय यात्रा ही सध्या आसाममधून मेघालय इथे आली असली तरीही ही यात्रा पुन्हा एकदा आसाममध्ये जाणार आहे. तसेच आसाम आणि मेघालयाच्या सीमेवर ते तरुणांशी देखील संवाद साधतील. 

हेही वाचा : 

Ayodhya : अयोध्येच्या राम मंदिरामुळे पर्यटक वाढणार आणि यूपीची तिजोरी भरणार, राज्याच्या महसुलात 25 हजार कोटींच्या वाढीची शक्यता

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Su‑30MKI Crash Flt Lt Purvesh Duragkar: भारतीय वायूदलाचं लढाऊ विमान कोसळलं, महाराष्ट्राचे सुपूत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर शहीद
भारतीय वायूदलाचं लढाऊ विमान कोसळलं, महाराष्ट्राचे सुपूत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर शहीद
तेजसनंतर आता सुखोई-30 कोसळलं; स्क्वाड्रन लेफ्टनंटसह महाराष्ट्राचे सुपूत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर शहीद, 12 वर्षात तब्बल आठव्यांदा सुखोई क्रॅश
तेजसनंतर आता सुखोई-30 कोसळलं; स्क्वाड्रन लेफ्टनंटसह महाराष्ट्राचे सुपूत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर शहीद, 12 वर्षात तब्बल आठव्यांदा सुखोई क्रॅश
त्या' दोन षटकांनी फिरवला सामन्याचा निकाल, भारत चौथ्यांदा T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत
IND vs ENG : 'त्या' दोन षटकांनी फिरवला सामन्याचा निकाल, भारत चौथ्यांदा T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत
इस्रायल इराण युद्धाचा भारतावर परिणाम, कोट्यावधी रुपयांचा तांदूळ अडकला, किंमतीत मोठी घसरण
इस्रायल इराण युद्धाचा भारतावर परिणाम, कोट्यावधी रुपयांचा तांदूळ अडकला, किंमतीत मोठी घसरण

व्हिडीओ

Arjun Tendulkar Marriage : अर्जुनची नवी इनिंग, सेलिब्रिटी वऱ्हाडी Special Report
Nitish Kumar Rajyasabha Bihar : राज्यसभेत नितीशकुमार, भाजपसाठी मोकळं बिहार Special Report
Jyoti Waghmare Rajysabha : राज्यसभेत वाघमारे आणि नाराजीचे नगारे Special Report
Maharashtra Rajyasabha Election : सर्वांचा विजय पक्का 'बिनविरोध'वर शिक्का Special Report
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Su‑30MKI Crash Flt Lt Purvesh Duragkar: भारतीय वायूदलाचं लढाऊ विमान कोसळलं, महाराष्ट्राचे सुपूत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर शहीद
भारतीय वायूदलाचं लढाऊ विमान कोसळलं, महाराष्ट्राचे सुपूत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर शहीद
IND vs ENG T20 World Cup Semi Final : मेहनत गौतम गंभीरची, चर्चा MS धोनीची! टीम इंडिया फायनलमध्ये जाताच सगळं क्रेडिट थाला घेऊन गेला, वानखेडेवर नेमकं काय घडलं?
मेहनत गौतम गंभीरची, चर्चा MS धोनीची! टीम इंडिया फायनलमध्ये जाताच सगळं क्रेडिट थाला घेऊन गेला, वानखेडेवर नेमकं काय घडलं?
Laxman Hake: महाराष्ट्रातील ओबीसींनो तुम्ही झोपा काढा, तुमचं आरक्षण संपलंय; राधाकृष्ण विखे पाटलांच्या निर्णयानंतर लक्ष्मण हाके संतापले
महाराष्ट्रातील ओबीसींनो तुम्ही झोपा काढा, तुमचं आरक्षण संपलंय; राधाकृष्ण विखे पाटलांच्या निर्णयानंतर लक्ष्मण हाके संतापले
Swatantrya Veer Savarkar : स्वातंत्र्यवीर सावरकरांना ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्याबाबतचा ठराव विधानसभेत मागे; राज्य सरकारने काय सांगितलं कारण? जाणून घ्या सविस्तर
स्वातंत्र्यवीर सावरकरांना ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्याबाबतचा ठराव विधानसभेत मागे; राज्य सरकारने काय सांगितलं कारण? जाणून घ्या सविस्तर
Baramati Byelection Election Commission: मोठी बातमी: बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या हालचालींना वेग, मतदान कधी, समोर आली महत्त्वाची अपडेट
मोठी बातमी: बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या हालचालींना वेग, मतदान कधी, समोर आली महत्त्वाची अपडेट
Rohit Pawar on VSR: अजितदादांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या VSR कंपनीच्या मालकाला सीआयडीकडून चौकशीवेळी व्हिआयपी ट्रिटमेंट; रोहित पवारांचा आरोप
काळ्या काचांची गाडी, शाही बडदास्त, VSR कंपनीच्या मालकाला सीआयडीकडून चौकशीवेळी व्हिआयपी ट्रिटमेंट: रोहित पवार
IND vs ENG T20 World Cup Semi Final : जेव्हा वानखेडेवर बापूने इंग्रजांचा पराभव निश्चित केला; तेव्हा गौतम गंभीर खुर्ची सोडून पळत सुटला...; पाहा टर्निंग पॉइंटचा Unseen Video
जेव्हा वानखेडेवर बापूने इंग्रजांचा पराभव निश्चित केला; तेव्हा गौतम गंभीर खुर्ची सोडून पळत सुटला...; पाहा टर्निंग पॉइंटचा Unseen Video
Kolhapur Crime Bribe case: सातबाऱ्यावर वडिलांचे नाव लावण्यासाठी 10 हजारांची लाच मागितली, कोल्हापूमध्ये एसीबीने उपसरपंच, ग्राम महसूल अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलं
सातबाऱ्यावर वडिलांचे नाव लावण्यासाठी 10 हजारांची लाच मागितली, कोल्हापूमध्ये एसीबीने उपसरपंच, ग्राम महसूल अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलं
Embed widget