एक्स्प्लोर

Ayodhya : अयोध्येच्या राम मंदिरामुळे पर्यटक वाढणार आणि यूपीची तिजोरी भरणार, राज्याच्या महसुलात 25 हजार कोटींच्या वाढीची शक्यता

Ayodhya Ram Mandir : अयोध्येत झालेल्या राम मंदिराच्या निर्मितीमुळे उत्तर प्रदेशच्या पर्यटनाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडल्यानंतर आता हे मंदिर सर्वसामान्यांसाठी खुलं होणार आहे. त्यामुळे या ठिकाणी आता देशभरातून भाविक आणि पर्यटक येण्याची शक्यता आहे. राम मंदिराच्या निर्मितीचा फायदा हा उत्तर प्रदेशच्या पर्यटन क्षेत्राला (Uttar Pradesh Tourism) होणार असून राज्याच्या महसुलात जवळपास 20 ते 25 हजार कोटींची वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

केंद्र सरकारच्या योजनेचा फायदा यूपीला

एसबीआयच्या अहवालानुसार, अयोध्येतील राम मंदिर आणि इतर पर्यटन योजनांमुळे उत्तर प्रदेशचा कर महसूल 20 हजार कोटी रुपयांनी वाढून 25 हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. केंद्र सरकारच्या तीर्थक्षेत्र पुनरुज्जीवन आणि अध्यात्मिक हेरिटेज ऑगमेंटेशन ड्राइव्ह (प्रसाद) योजनेचा उत्तर प्रदेशला खूप फायदा होत असल्याचे अहवालात म्हटले आहे.

यूपीमध्ये पर्यटकांचा खर्च दुप्पट होईल

उत्तर प्रदेशातील पर्यटकांची संख्या आणि त्यांचा होणारा खर्च हा आता दुपटीने वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 2022 मध्ये देशांतर्गत पर्यटकांनी उत्तर प्रदेशमध्ये 2.2 लाख कोटी रुपये खर्च केले होते. विदेशी पर्यटकांनी राज्यात 10 हजार कोटी रुपये खर्च केले होते. एसबीआयच्या अहवालानुसार, पर्यटनाला चालना देण्यासाठी राम मंदिर आणि इतर योजनांच्या आधारे राज्यातील पर्यटन खर्च यावर्षी 4 लाख कोटी रुपयांच्या पुढे जाऊ शकतो.

यूपीची अर्थव्यवस्था इतकी होईल

एसबीआयच्या अहवालात उत्तर प्रदेशच्या अर्थव्यवस्थेबद्दलही काही नोंदी करण्यात आल्या आहेत. अहवालात असे म्हटले आहे की 2027-28 या आर्थिक वर्षात देशाची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर्सची होईल तोपर्यंत उत्तर प्रदेशची अर्थव्यवस्था 500 अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडू शकते. नॉर्वेसारख्या देशाच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या आकारापेक्षा हे प्रमाण जास्त असेल. भारतातील अर्थव्यवस्थेत हे दुसरे सर्वात मोठे योगदान असेल.

इतका व्यवसाय आधीच झाला आहे

राम मंदिरामुळे एकाच वेळी अनेक पैलूंवर परिणाम होत आहे. मंदिराचे बांधकाम सुरू झाल्यापासून रिअल इस्टेट क्षेत्रात तेजी पाहायला मिळत आहे. अयोध्येतील आणि आसपासच्या जमिनींचे भाव गगनाला भिडले आहेत. पर्यटकांच्या संभाव्य आगमनाच्या पार्श्वभूमीवर कंपन्यांनी आतापासूनच तयारी जोरात सुरू केली आहे. यामुळे विशेषतः पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. राम मंदिरामुळे देशभरातील व्यापाऱ्यांना 1 लाख कोटी रुपयांहून अधिकचा व्यवसाय झाला असल्याचं एका आकडेवारीतून समोर आलं आहे.

ही बातमी वाचा: 

 

महत्त्वाच्या बातम्या

EPFO Big Update : 25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार EPFO चा 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
Currency notes RBI: 10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
Ethanol Blended Petrol : ...तर पेट्रोलचा दर 125 रुपये लिटर झाला असता! इथेनॉल ब्लेंडिंगमुळे कसे वाचले तुमचे 30 रुपये? सरकारने दिली माहिती
...तर पेट्रोलचा दर 125 रुपये लिटर झाला असता! इथेनॉल ब्लेंडिंगमुळे कसे वाचले तुमचे 30 रुपये? सरकारने दिली माहिती
Real estate house possession RERA: नव्या घराच्या पझेशनची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी, चार महिन्यांचा उशीर होणार, केंद्र सरकारचा महत्त्वाचा आदेश
नव्या घराच्या पझेशनची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी, चार महिन्यांचा उशीर होणार, केंद्र सरकारचा महत्त्वाचा आदेश

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळ, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळ, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
Embed widget