एक्स्प्लोर
Advertisement
येडियुरप्पांच्या मुलाने काँग्रेसच्या दोन आमदारांना डांबलं?
येडियुरप्पा यांच्या मुलाने बंगळुरुतील हॉटेल फिंचमध्ये काँग्रेसच्या दोन आमदारांना डांबून ठेवल्याचा आरोप आहे. आरोपांची पडताळणी करण्यासाठी पोलीस महासंचालक हॉटेलात दाखल झाले.
बंगळुरु : कर्नाटकमध्ये सत्तेचा संघर्ष टोकाला पोहोचला आहे. सरकार स्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री येडियुरप्पा आणि भाजपने आमदारांना पळवल्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला जात आहे. शिवाय येडियुरप्पा यांच्या मुलाने बंगळुरुतील हॉटेल फिंचमध्ये काँग्रेसच्या दोन आमदारांना डांबून ठेवल्याचा आरोप आहे. आरोपांची पडताळणी करण्यासाठी पोलीस महासंचालक हॉटेलात दाखल झाले.
दरम्यान, येडियुरप्पा यांच्या मुलाने काँग्रेस आमदाराच्या पत्नीला फोन करुन 15 कोटींची ऑफर दिली, असाही आरोप करण्यात आला आहे. याची ऑडिओ क्लिप काँग्रेसने जारी केली.
याचदरम्यान, भाजप नेते जनार्दन रेड्डी यांचीही ऑडिओ क्लिप जारी करण्यात आली. त्यांनी काँग्रेसच्या आमदारांना ऑफर दिल्याचा दावा आहे. भाजपचे सोमसेखर रेड्डी काँग्रेसच्या दोन आमदारांसोबत असल्याचीही माहिती आहे. रेड्डी बंधूंच्या ताब्यात काँग्रेसचे पाच आमदार असल्याचं बोललं जात आहे.
काँग्रेसचे आमदार आनंद सिंह आणि प्रताप पाटील गौडा फिंच हॉटेलमध्ये आढळून आले. आज 4 वाजता कर्नाटक विधानसभेत बहुमत चाचणी होणार आहे. त्यापूर्वी आमदारांचा शपथविधी झाला. विधानसभेचं कामकाज दुपारी 3.30 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं आहे. शिवाय भाजपने तातडीची बैठकही बोलावली आहे.
संबंधित बातम्या :
येडियुरप्पांची अग्निपरीक्षा, दुपारी 4 वाजता बहुमत चाचणी
...तेव्हा 7 दिवसातच येडियुरप्पांनी मुख्यमंत्रीपद गमावलं होतं!
बहुमत चाचणी म्हणजे काय? मतदान कसं होणार?
कर्नाटक बहुमत चाचणी : 2 आमदारांना येडियुरप्पांच्या मुलाने डांबलं, काँग्रेसचा आरोप
भाजपच्या या खेळीने जेडीएस-काँग्रेसचं सत्तेचं स्वप्न भंगणार?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
नाशिक
निवडणूक
निवडणूक
Advertisement