एक्स्प्लोर
Advertisement
ओवेसी यांच्याविरोधात तक्रार दाखल, अटकेची मागणी
हैदराबादः एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांच्याविरोधात हैदराबादमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने हैदराबादमध्ये पकडलेल्या तरुणांना ओवेसी यांनी कायदेशीर मदत करणार असल्याचं जाहीर केलं होतं, त्यानंतर त्यांच्यावर देशविरोधी वक्तव्य केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
भाजपा आणि जेडीयू या पक्षांनी देखील ओवेसी यांचा समाचार घेतला आहे. देशविरोधी वक्तव्य केल्याबद्दल ओवेसींवर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी दोन्ही पक्षांनी केली आहे.
आयसिस या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरुन एनआयएने हैदराबादच्या पाच तरुणांना अटक केली आहे. मात्र, या तरुणांचा आयसिसशी कसलाही संबंध नसल्याचा दावा ओवेसी यांनी केला होता. त्या तरुणांना एमआयएम पक्ष कायदेशीर मदत करेल, असंही ओवेसी यांनी म्हटलं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
हिंगोली
निवडणूक
Advertisement