एक्स्प्लोर
देशवासियांना दिवसाला 150 कोटी रुपयांची गरज, पण मिळतात...
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीच्या निर्णयाची घोषणा करुन आज 18 दिवस झाले आहेत. नोटाबंदीच्या या निर्णयामुळे 500 आणि 1000 रुपयांच्या जवळपास 15 लाख कोटींच्या चलनातील जुन्या नोटा रद्दी झाल्या आहेत. त्यामुळे एवढ्या मोठ्याप्रमाणावरील चलन पुन्हा उभे करण्यासाठी जवळपास 6 महिन्यांचा कालावधी लागू शकतो असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. नोटाबंदीच्या निर्णयामुळे सध्या मुंबई आणि दिल्ली सारख्या महानगरांमध्ये 17 टक्केच नागरिक आपल्या गरजा पूर्ण करु शकत असल्याचे चित्र आहे.
इकॉनॉमिक्स टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईसारख्या महानगरात प्रतिदिन 150 कोटी रुपयांची उलाढाल रोखीने होते. पण नोटाबंदीच्या निर्णयानंतर मुंबईमध्ये 25 कोटी रुपयांचीच उलाढाल होत आहे. म्हणजेच देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईतील 83 टक्के जनतेला काटकसरीने दिवस काढावे लागत आहेत.
तर दुसरीकडे राजधानी दिल्ली-एनसीआरमध्ये प्रतिदिन 130 कोटी रुपयांची उलाढाल होते. पण सध्या तिथेही हा आकडा 25 कोटींवरच स्थिरावला आहे. म्हणजेच दिल्लीतीलही 80 टक्के जनतेला आपल्या गरजा भागवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. एकंदरितच देशातील सर्वजनतेला चलनतुटवड्याचा सामना करावा लागत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्रीडा
बीड
क्रीडा
Advertisement