CM-PM Meet : आज केवळ सदिच्छा भेट होती, राजकारणावर चर्चा झाली नाही, पंतप्रधानांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी माझं संपूर्ण कुटुंब यावेळी माझ्यासोबत होतं. पंतप्रधानांना भेटल्याचं आनंद आणि समाधान वडिलांच्या चेहऱ्यावर होतं. पतंप्रधानांनी नातवासोबतही खूप गप्पा मारल्या," अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
CM Eknath Shinde PC : "आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी माझं संपूर्ण कुटुंब यावेळी माझ्यासोबत होतं. पंतप्रधानांना भेटल्याचं आनंद आणि समाधान वडिलांच्या चेहऱ्यावर होतं. पतंप्रधानांनी नातवासोबतही खूप गप्पा मारल्या," अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी आज राजधानी दिल्लीत पंतप्रधानांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांना याविषयी माहिती दिली. पंतप्रधानांनी भेटीसाठी जास्त वेळ दिला होता. त्यासाठी त्यांचे आभार. चांगली चर्चा भेटीदरम्यान झाली, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.
या भेटीत पंतप्रधानांना इर्शाळवाडी दरड दुर्घटना, राज्यातील पावसाची स्थिती, रखडलेले प्रकल्पांची माहिती दिली. यावेळी पंतप्रधांनांनी रडखडेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन मोदींनी दिल्याचं एकनाथ शिंदे यांनी दिली. या बैठकीत मुंबईतील धारावी प्रकल्पावरही चर्चा झाल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
एकनाथ शिंदे सकाळी साडेअकराच्या सुमारास पंतप्रधानांच्या भेटीसाठी पोहोचले होते. जवळपास दोन ते सव्वादोन तासांची ही भेट होती. दुपारी अमित शाह यांचीही कुटुंबासह भेट घेणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
चांगलं काम करण्यासाठी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना उत्तम आरोग्य मिळावं, अशी प्रार्थना : एकनाथ शिंदे
दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना काल शुभेच्छा दिल्या होत्या. देवेंद्र फडवणीस आणि अजित पवार यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. आम्ही टीम म्हणून काम करतोय. या राज्याचा कारभार पुढे नेतोय. त्यामुळे चांगले सहकारी आहेत. त्यांना चांगलं काम करण्यासाठी उत्तम आरोग्य मिळावं, अशी मी प्रार्थना करतो, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दिली.
मुख्यमंत्र्यांच्या कौटुंबिक भेटीची चर्चा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल (21 जुलै) दहाच्या सुमारास अचानक मुंबईहून दिल्लीत दाखल झाले. आठवड्याभरातील मुख्यमंत्र्यांची ही दुसरी दिल्लीवारी आहे. NDA बैठकीपाठोपाठ तीन दिवसात एकनाथ शिंदे पुन्हा पंतप्रधानांच्या भेटीसाठी दिल्लीत दाखल झालेय आणि सहकुटुंब पंतप्रधानांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय गदारोळात मुख्यमंत्र्यांच्या कौटुंबिक भेटीची सध्या चर्चा रंगली आहे.
एनडीए बैठकीसाठी एकनाथ शिंदे 18 जुलैला दिल्लीत
याआधी मंगळवारी 18 जुलै रोजी एकनाथ शिंदे दिल्लीला गेले होते. त्यावेळी भाजपने आयोजित केलेल्या एनडीएच्या बैठकीसाठी ते दिल्लीला गेले होते. त्यावेळी एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तिघांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक झाली होती. त्यानंतर तीनच दिवसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल झाले आहेत.