एक्स्प्लोर
मिजासखोर आयएएस ऑफिसरवर सोशल मीडियातून टीका

नवी दिल्ली : हॉस्पिटलमधील महिला रुग्णाची चौकशी करताना एक पाय तिच्या बेडवर ठेवून ऐटीत उभं राहणं एका नवख्या आयएएस अधिकाऱ्याच्या चांगलंच अंगलट आलं आहे. सोशल मीडियावर त्याचा फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्याच्यावर टीका केली आहे. छत्तीसगडमध्ये 2013 च्या बॅचचे आयएएस अधिकारी डॉ. जगदिश सोनकर एका सरकारी रुग्णालयात रुटिन इन्स्पेक्शनसाठी गेले होते. सोनकर यांच्याकडे वैद्यकीय पदवी आहे. यावेळी कुपोषित बालकांच्या आईंची भेट घेत असताना डावा पाय त्यांनी बेडच्या स्टील रेलिंगवर ठेवला होता. https://twitter.com/Moi_Asomiya/status/728044985937858560 अशा ऐटीत उभे राहून विचारपूस करतानाच त्यांचा फोटो काढण्यात आला. त्यानंतर सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल झाला आणि यथेच्छ टीकाही झाली. आयएएस म्हणजे इंडियाज अॅरोगंट (उद्धट) सर्व्हिस अशा शब्दातही टिपण्णी करण्यात आली. मात्र सोनकरांनी त्यावर कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही.
आणखी वाचा























